कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या चार सभापतिपदांच्या निवडीसाठी महायुतीमधील घटक पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. सोमवारी (दि. ३० मार्च) दुपारी दोन वाजता ही निवडीची विशेष सभा होईल. या दिवशी १० ते १२ या वेळेत जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सभेत ही निवड प्रक्रिया होईल. पीठासन अधिकारी म्हणून करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत आणि उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. आता सर्वांना या चार समित्यांच्या सभापतींच्या नावांचे वेध लागले आहेत. यातील बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतिपद हे शिंदेसेनेला मिळणार आहे. शिक्षण व अर्थ समिती सभापतिपद जनसुराज्यला मिळणार असून, यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला समाजकल्याण समितीचे सभापतिपद निश्चित करण्यात आले आहे.राष्ट्रवादीला आणखी एक महिला आणि बालकल्याण समितीचे सभापतिपद मिळणार आहे.बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतिपदासाठी शिंदेसेनेतच अंतर्गत रस्सीखेच राहणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात हे पद द्यायचे झाल्यास अरुण जाधव, अर्चना निकम आणि सारिका नांदेकर या दावेदार राहतील, तर चंद्रदीप नरके इंद्रजित पाटील यांच्यासाठी आग्रही राहतील. शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदासाठी जनसुराच्यचे आमदार विनय काेरे नेमके कोणाला प्राधान्य देणार याची उत्सुकता आहे.शीतल यादव, सर्जेराव पाटील पेरीडकर, अमरसिंह पाटील या तीन माजी सभापतींपैकी कोणाला संधी मिळते की अनिरुद्ध रेडेकर, स्नेहल वेल्हाळ, शोभा बेलेकर यांच्यापैकी कोणाला लॉटरी लागणार आहे लवकरच स्पष्ट होणार आहे.राजकुंवर गायकवाड, अमृता डोंगळे, मानसी भोगण चर्चेतराष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला आणि बालकल्याण समितीसाठी अमृता डोंगळे आणि मानसी भोगण आणि राजकुंवर गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत. या तिघी नवीन असल्या तरी मंत्री हसन मुश्रीफ राधानगरी, चंदगड किंवा शाहूवाडी तालुक्याला न्याय देण्यासाठी ही भूमिका घेऊ शकतात. करवीरमधून राष्ट्रवादीच्या सदस्या रेखा मुगडे यांच्यासाठी राहुल पाटील आग्रही राहू शकतात. अध्यक्षपदासाठी शेवटच्या टप्प्यात चर्चेत आलेल्या पूजा दिलीप पाटील यादेखील दावेदार असू शकतात. मानसी भोगण, विद्या पाटील, रचना गावडे यांच्यातून निवड करताना मुश्रीफ यांचीही कसोटी लागणार आहे.
शिरोळ तालुक्याला पद निश्चितसमाजकल्याण समितीचे सभापतिपद हे शिरोळ तालुक्याला निश्चित आहे. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीचे चार उमेदवार या तालुक्यातून निवडून आले असून, अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, श्रद्धा गायकवाड आणि उत्तरा शिंदे यांच्यापैकी कोणाला लॉटरी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Web Summary : Lobbying intensifies within Kolhapur ZP's ruling coalition for four committee chairperson posts. Key contenders emerge from Shinde Sena, Jansurajya, and the Nationalist Congress Party, with internal competition high.
Web Summary : कोल्हापुर ZP में चार समिति सभापति पदों के लिए सत्ताधारी गठबंधन में लॉबिंग तेज हो गई है। शिंदे सेना, जनसुराज्य और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से प्रमुख दावेदार सामने आए हैं, आंतरिक प्रतिस्पर्धा उच्च है।