कुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा : नागाळा पार्कमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:24 IST2020-07-08T11:19:25+5:302020-07-08T11:24:40+5:30

रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

Motor vehicle hit by dog, crime against youth: Incident at Nagala Park | कुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा : नागाळा पार्कमधील घटना

कुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा : नागाळा पार्कमधील घटना

ठळक मुद्देकुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा नागाळा पार्कमधील घटना

 कोल्हापूर : रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती, नागाळा पार्कमध्ये समृद्धी बहिरशेठ राहतात. त्यांच्यासह परिसरातील काहीजण माणुसकीच्या भावनेतून भटक्‍या जनावरांना अन्न व औषधोपचार करतात. दि. २० जूनला सकाळी खानविलकर पेट्रोल पंपानजीक एका हॉटेलसमोर रस्त्याकडेला कुत्रे झोपले होते. त्याच वेळी तेथून एक भरधाव मोटार गेली.

त्या चालकाने जाणूनबुजून त्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केले. त्याबाबतची तक्रार बहिरशेठ यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार संशयित ऋषिकेश दीक्षित याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Motor vehicle hit by dog, crime against youth: Incident at Nagala Park