शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

खणदाळ येथे दोन मुलांसह मातेची आत्महत्या

By admin | Updated: September 11, 2014 00:38 IST

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

नूल : गणेशोत्सवासाठी माहेरी आलेल्या महिलने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लता संजय इदरगुच्ची (वय २५, रा. हत्तरगी, ता. हुक्केरी) असे महिलेचे नाव आहे. मुलगा विवेक (३) व मुलगी वैष्णवी (दीड वर्ष) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे आज, बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.खणदाळ येथील शंकर दुंडाप्पा न्हावी यांना सविता, गीता, लता या तीन मुली व संदीप हा मुलगा आहे. गीता व लता या जुळ्या बहिणी. यांतील लताचा विवाह हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील संजय आप्पासाहेब इदरगुच्ची यांच्याशी २००९ मध्ये झाला होता. संजय याचे अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे सलूनचे दुकान असल्याने ते मुलांसह अरळगुंडी येथे राहत होते. जानेवारी २०१४ मध्ये अरळगुंडीतील दुकान बंद करून ते गावी हत्तरगीला राहण्यासाठी गेले व तेथे सलूनचे दुकान सुरू केले. ते सासरी सासू, पती, पत्नी मुलांसह वास्तव्यास होते; तर सासरे आप्पासाहेब हे बेळगाव येथे दुसऱ्या पत्नीसह स्थायिक झाले आहेत. लताचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. ती अत्यंत सुस्वभावी होती. विवेक हा कर्णबधिर होता. आत्महत्येचे कारण अस्पष्टलता ही गणेशोत्सवासाठी आठ दिवसांपूर्वी माहेरी खणदाळ येथे आली होती. मात्र, सोमवारी (दि. ८) सायंकाळपासून ती मुलांसह घरातून बेपत्ता झाली. सासरी व नातेवाइकांकडे शोधाशोध केली असता ती सापडली नाही. आज दुपारी घराशेजारील विहिरीत तिच्या वैष्णवी या मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेतला. मुलगा विवेक व लताचाही मृतदेह सापडल्याने तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.