Kolhapur: मुलीला जन्म दिल्यानंतर आई देवाघरी; नियतीने हिरावले छत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:32 IST2025-06-23T13:31:42+5:302025-06-23T13:32:29+5:30

काही दिवसांपूर्वी झाला होता विवाहाचा पहिला वाढदिवस

Mother from Asgaon Panhala taluka kolhapur dies after giving delivery | Kolhapur: मुलीला जन्म दिल्यानंतर आई देवाघरी; नियतीने हिरावले छत्र

Kolhapur: मुलीला जन्म दिल्यानंतर आई देवाघरी; नियतीने हिरावले छत्र

कळे : आसगाव (ता. पन्हाळा) येथील चंद्रभागा प्रवीण पाटील (वय २२) या तरुण विवाहितेचा सीपीआर रुग्णालयात प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र, तिच्या आयुष्याच्या पहिल्याच क्षणी नियतीने तिच्या डोक्यावरचे आईचे छत्र हिरावून घेतले. चंद्रभागा व प्रवीण यांच्या विवाहाचा काही दिवसांपूर्वी पहिला वाढदिवस झाला होता. प्रवीण पाटील वडिलोपार्जित शेती सांभाळून खासगी नोकरी करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.

साबळेवाडी (ता. करवीर) येथील चंद्रभागा यांचा वर्षभरापूर्वी प्रवीण यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. शुक्रवारी बाळंतपणासाठी त्यांना कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. शनिवारी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, त्यानंतर रक्तस्राव सुरूच राहिला. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचार सुरू असतानाच चंद्रभागा यांची शनिवारी रात्री प्राणज्योत मालवली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, दीर, जाऊ, असा परिवार आहे.

Web Title: Mother from Asgaon Panhala taluka kolhapur dies after giving delivery