कोल्हापूर : जिल्ह्यात उद्या, शनिवारी (दि.७ फेब्रुवारी) जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदार, मतदान कर्मचारी आणि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील दोन हजार ६९१ बूथवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सेवा पुरविण्यात येत आहे. याकरिता सुमारे दोन हजार चार पथके तैनात करण्यात आली आहेत.जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांसह आरोग्य पथके उपलब्ध असतील. जिल्ह्यातील ८१ प्राथमिक आरोग्य केंद्रे मतदानाच्या दिवशी ८१ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत राहतील, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार मिळतील. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या व कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. सर्व पथकांना औषधसाठा आणि प्रथमोपचार कीट पुरविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
- मतदान केंद्रे २, ६९१
- आरोग्य पथके २००४
- रुग्णवाहिका ८१
Web Summary : Over 2000 health teams will be present at Kolhapur's ZP election booths on February 7th. Ambulances and medical staff are prepared for emergencies, ensuring voter and staff well-being during the polling process.
Web Summary : कोल्हापुर ZP चुनाव के लिए 7 फरवरी को 2000 से अधिक स्वास्थ्य दल मतदान केंद्रों पर मौजूद रहेंगे। एम्बुलेंस और चिकित्सा कर्मचारी आपात स्थिति के लिए तैयार हैं, ताकि मतदान प्रक्रिया के दौरान मतदाताओं और कर्मचारियों की भलाई सुनिश्चित हो सके।