मान्सून उद्यापासून सक्रिय होणार, कोल्हापुरात मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:40 IST2025-06-11T12:39:56+5:302025-06-11T12:40:17+5:30

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात मान्सून उद्या, गुरुवार दि. १२ जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या, गुरुवार ...

Monsoon to become active from tomorrow, moderate to heavy showers expected in Kolhapur | मान्सून उद्यापासून सक्रिय होणार, कोल्हापुरात मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज

मान्सून उद्यापासून सक्रिय होणार, कोल्हापुरात मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात मान्सून उद्या, गुरुवार दि. १२ जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या, गुरुवार दि. १२ ते सोमवार दि. १६ जून अशा पाच दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते, विशेषत: शनिवार दि. १४ ते सोमवार दि. १६ जून ह्या तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीचे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

सध्या काही शेतकरी धूळ पेरणीच्या विचारात असून त्यांनी मान्सून सक्रिय झाल्यावर म्हणजे १५ जूननंतर, चांगल्या मान्सून पावसाची ओल, उत्तम वाफसा आणि स्वतःच्या विवेकावर पेरणीचा निर्णय घ्यावा, परंतु त्यातही ज्यांच्याकडे बक्कळ ओल व सिंचनाची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी एक दोन दिवसात स्वतःच्या जबाबदारीवर पेरणी करावी. ज्यांनी मे महिन्याच्या बे-मोसमी पावसावर गेल्या ८-१० दिवसांपूर्वी पेरण्या केल्या असतील अशा शेतकऱ्यांनीही घाबरू नये.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुण्या-मुंबईत पोहोचलेला मान्सून जाग्यावरच खिळलेला आहे. त्यात प्रगती नाही, मात्र गुरुवार दि. १२ जूनपासून मान्सूनची सक्रियता आणि वाटचालीसाठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसासाठी १९ जूनपर्यंत वातावरण विशेष अनुकूल नसले तरी शुक्रवार, दि. १३ जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार दि. १४ जूनपर्यंत मृगनक्षत्राच्या मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते. थोडक्यात मंदावलेला मान्सून प्रवाह सक्रिय होऊन पुढे वाटचालीस चालना मिळू शकते. -माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ, आयएमडी.

Web Title: Monsoon to become active from tomorrow, moderate to heavy showers expected in Kolhapur