शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात गांजा, मोबाईल फेकणाऱ्या सात गुंडांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील बंदिवानांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने गांजा व मोबाईल फेकणाऱ्या ‘विक्या मन्या गॅंग’ या गुन्हेगारी संघटनेच्या दुसऱ्या ...

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील बंदिवानांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने गांजा व मोबाईल फेकणाऱ्या ‘विक्या मन्या गॅंग’ या गुन्हेगारी संघटनेच्या दुसऱ्या फळीतील सात गुंडांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

मोक्कांतर्गत कारवाई केलेल्यांची नावे अशी : ऋषिकेश सदाशिव पाटील (वय २५, रा. कोदवडे, ता. राधानगरी), भिष्मा ऊर्फ भिमा सुभेदार चव्हाण (२८, रा. मूळ रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. संगली. सद्या रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०, रा. गणेश कॉलनी, जयसिंगपूर, ता. शिरोळ), जयपाल किसन वाघमोडे (३०, रा. वडीये रायबाग, ता. कडेगाव, जि. सांगली), शुभम सोपाळ येवळे (२३, रा. कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी), ओमका ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (२२, रा. शहापूर इचलकरंजी), शकील ऊर्फ शकलीन झाकीर गवंडी (२४, रा. सूर्यवंशी गल्ली, इचलकरंजी).

इचलकरंजी शहर व परिसरात गुन्हेगारी वर्तुळात कुप्रसिद्ध असलेल्या विकास ऊर्फ विक्या रामआवतार खंडेलवाल व बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर तस्कर मन्या ऊर्फ मनीष रामविलास नागोरी यांच्यासह त्याचे ‘विक्या मन्या गॅंग’ या संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कळंबा कारागृहात २०१९ पासून आहेत. गॅंगच्या दुसऱ्या फळीतील गुंडांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील भिंतीवरून गांजा व मोबाईल फेकून ते आतील सहकाऱ्यांना पुरविल्याचे उघड झाले होते.

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्यांपैकी ओमकार गेंजगे हा खून प्रकरणात कारागृहात असताना त्याने शुभम येवळे याचे मोबाईल कार्ड बाहेर फोन करण्यासाठी वापरले होते. तसेच याच मोबाईलवर विकास खंडेलवाल यानेही बाहेरील सहकाऱ्यांशी संभाषण केल्याचे तपासात उघड झाले होते. गरुवारी मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या गुंडांनी कारागृहात व कारागृहाबाहेर साहाय्य केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ऋषीकेश पाटील, शुभम येवळे, शकील गवंडी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्याप्रकरणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गॅंगमधील सातजणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.