मोबाईल दुकान खाक; पाच लाखांची हानी

By Admin | Updated: December 18, 2014 00:00 IST2014-12-17T23:38:46+5:302014-12-18T00:00:46+5:30

लांजा येथील घटना : शॉर्टसर्किटमुळे लागली आग

Mobile shop template; Loss of five lakhs | मोबाईल दुकान खाक; पाच लाखांची हानी

मोबाईल दुकान खाक; पाच लाखांची हानी

लांजा : लांजा एस.टी.बसस्थानकासमोरील मोबाईलचे एक दुकान काल, मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाले. त्यात जवळजवळ पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बसस्थानकासमोरील गुरुप्रसाद बेकरीशेजारी मंगल पुरोहित यांच्या मालकीचे श्री खेतेश्वर मोबाईल पॉर्इंट या नावाचे दुकान आहे. काल लांजा शहरात आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रात्री ९ वाजेपर्यंत बाजारामध्ये खरेदी-विक्री सुरू होती. १० वाजता मोबाईलचे दुकान बंद करून पुरोहित घरी गेले. मध्यरात्री दोनच्या दरम्यान शहरामध्ये फिरणाऱ्या गुरख्याला अचानक मोबाईल शॉपीमधून धूर येत असल्याचे दिसले. गवाणे येथील यात्रा आटोपून येणाऱ्या यात्रेकरूंनाही हा धूर दिसला. त्यांनी याच बिल्डिंगमध्ये राहणारे मालक गुरुप्रसाद देसाई यांना दुकानात आग लागल्याची कल्पना देण्यात आली. त्याचबरोबर शेजारीच असणारे चहावाले सकपाळ व पानशॉपवाले डांगे यांनी येथे धाव घेतली. त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचालकाने थांबून ट्रकमधील टॉमी घेऊन दुकानाचे शटर फोडले. उपस्थितांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार धावपळ केली.
/ पान ३ वर

Web Title: Mobile shop template; Loss of five lakhs