शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल कंपन्यांना कोट्यवधीचा चुना

By admin | Updated: January 25, 2015 01:08 IST

दोघांना अटक : आंतरराष्ट्रीय कॉलचे बेकायदा लोकल कॉलमध्ये रूपांतर; मोठे रॅकेट शक्य

इचलकरंजी : आंतरराष्ट्रीय कॉलचे लोकल कॉलमध्ये बेकायदा रूपांतर करून भारत सरकार व खासगी मोबाईल कंपन्यांची सुमारे दोन कोटींची फसवणूक करणारे रॅकेट इचलकरंजीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी संजय जयपाल कागवाडे (वय ४०, रा. जनता चौक, इचलकरंजी) व सयाजी रघुनाथ माने (३८, रा. शिरोळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे फसवणूक करणारे रॅकेट असण्याची शक्यता असून, या दोघांनी ही मशीन ज्याच्याकडून घेतली, तो फरार झाल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या कारवाईमध्ये पोलिसांनी विविध कंपन्यांचे ३२ सीमकार्ड, संगणक, इंटरनेट मोडेम व चायना मेड मशिनरी असे सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत चायना मेड मशिनरी वापरून संजय हा आंतरराष्ट्रीय कॉल्सचे व्हीओआयपीच्या माध्यमातून इंटरनेटवर व सीमबॉक्स यांच्या साहाय्याने त्यांचे आयडेंटी बदलून त्याचे लोकल कॉलमध्ये रूपांतर करून अनधिकृत सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत होता. त्यासाठी लागणारे सीमकार्ड स्वत:च्या नावे खरेदी करून सयाजी माने हा त्याला साहाय्य करीत होता. दोघांनीही पैसे मिळविण्यासाठी हे कृत्य केल्याचे कबूल केले असून, त्यांनी ही सर्व मशिनरी कोणाकडून खरेदी केली, या पाठीमागे आणखीन कोणी मास्टर मार्इंडचा सहभाग आहे काय. त्याचबरोबर अन्य कोणकोणत्या ठिकाणी अशा स्वरूपाची मशिनरी वापरून अनधिकृत काम सुरू आहे का, याचा तपास सुरू असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, संजयने ज्याच्याकडून या मशिनरी घेतल्या, त्याला कारवाईची कुणकुण लागल्याने तो पसार झाला. त्यामुळे तो सापडल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल. आंतरराष्ट्रीय कॉलची छेडछाड होत असल्याची राष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन विभागाला माहिती मिळाल्याने सिग्नलच्या साहाय्याने येथील जनता बॅँक परिसरातील एका साडी सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या अनधिकृत केंद्रावर काल, शुक्रवारी दुपारी पथकाने छापा टाकला. यामध्ये संजयने डीनस्टार कंपनीच्या सीमबॉक्समधून आयडियाचे इंटरनेट कनेक्शन जोडून त्यामध्ये व्होडाफोन, डोकोमो, रिलायन्स अशा कंपन्यांचे ३२ सीमकार्ड वापरून आंतरराष्ट्रीय कॉलचे लोकल कॉलमध्ये रूपांतर करत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला रंगेहात पकडून तेथील सर्व मशिनरी जप्त केली. हे काम संजय राहत्या घरीच करत असल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची पोलिसांनी काल,शुक्रवारी दिवसभर कसून चौकशी केली. त्यानंतर संजय व त्याला सीमकार्ड आणून देणारा सयाजी या दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. भारत सरकार व विविध खासगी कंपन्यांचे यामध्ये प्रथमदर्शनी २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढल्यास या फसवणुकीचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोघांवर माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर, फसवणूक, संगनमत व इंडियन टेलिग्रॅम अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत. पथकामध्ये टेलिकम्युनिकेशन विभागाचे डीओटी टर्म विंगचे उपमहानिदेशक अशोक मोहबे, सहायक महानिदेशक अमित रस्तोगी, सहायक निदेशक सुरेश गोपीनाथ मेनन, बळिराम बावस्कर यांच्यासह कोल्हापूर व स्थानिक पोलिसांचा समावेश होता. (प्रतिनिधी)