शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य, कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापांखाली चिरडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:17 IST

उद्धवसेनेच्यावतीने वेगळेच आंदोलन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांनी माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात आल्यावर चोप देऊ, असा इशारा देत उद्धवसेनेच्या वतीने गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापाखाली चिरडण्याचे वेगळेच आंदोलन सोमवारी (दि. ७) दुपारी येथे करण्यात आले. जिल्हाप्रमुख रवी इंगवले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.कोणाला किती भाषा येतात या विषयावरून शिंदेसेनेेचे आमदार गायकवाड यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल विधान केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धवसैनिक दुपारी एकत्र आले. यावेळी गायकवाड यांचे पोस्टर रस्त्यावर ठेवून त्यावर घोडा नाचवण्यात आला. यावेळी इंगवले म्हणाले, छत्रपतींचा मानसन्मान वेशीवर टांगण्याचे धोरण शासनाने ठरवल्याचे दिसून येत आहे. यापुढे अशी वक्तव्ये थांबली नाहीत तर कोल्हापुरातून थेट टकमक टोक दाखवले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. विशाल देवकुळे, राजेंद्र जाधव, रवी चौगले, चंद्रकांत भोसले, दीपक गौड, राजेंद्र पाटील, धनाजी दळवी, विजय नाईक, दीपा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.