गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:26 IST2026-04-13T11:24:27+5:302026-04-13T11:26:32+5:30

'गोकुळ' दूध संघामध्ये चुकीचा कारभार सुरू असून एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने तत्कालीन विभागीय उपनिबंधक (दुग्ध) डॉ. महेश कदम यांनी ३७०० नवीन दूध संस्थांच्या नोंदणीस मंजुरी दिली असून त्या संस्थांसह डॉ. कदम यांची ईडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली.

Misconduct in Gokul? Hasan Mushrif's explanation on Shivajirao Patil's allegations | गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण

गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड: 'गोकुळ' दूध संघामध्ये चुकीचा कारभार सुरू असून एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने तत्कालीन विभागीय उपनिबंधक (दुग्ध) डॉ. महेश कदम यांनी ३७०० नवीन दूध संस्थांच्या नोंदणीस मंजुरी दिली असून त्या संस्थांसह डॉ. कदम यांची ईडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. सामान्य दूध उत्पादकांच्या मालकीचा संघ राहावा, कोणत्याही घराणेशाहीच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी 'गोकुळ'वर तातडीने प्रशासक नियुक्त करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महेश कदम यांना एवढे मोठे बक्षीस का? 

सावंतवाडी येथे ४०० संस्थांचे सहायक निबंधक असणारे महेश कदम यांच्यावर थेट सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर या पदाची जबाबदारी दिली कशी? त्याचीही चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

महायुती म्हणून भ्रष्टाचार खपवून घ्यायचा का?

महायुतीची सत्ता आहे म्हणून येथील भ्रष्टाचार खपवून घ्यायचा का? सामान्य दूध उत्पादकांच्या हितासाठी यापुढे लढत राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 'गोकुळ'च्या मागील निवडणुकीत ३८०० भीती आहे. ध संस्था मतदानास पात्र होत्या. पाच वर्षांत ३७०० संस्था वाढल्या आहेत. त्यापैकी ३ हजार संस्थांची नोंदणी एकटे डॉ. महेश कदम यांनी केली आहे. यातील बहुतांशी संस्था या करवीर, राधानगरी व कागल तालुक्यातील असल्याने गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांचे 'गोकुळ'मधील अस्तित्व संपून जाण्याची

मुंबईतील दुधाचा मलिदा कोण खातोय?

'गोकुळ'मध्ये रोज किती संकलन होते, मुंबईला किती पाठवले जाते, मुंबईला जाताना किती हजार दूध वाढते. हा मलिदा कोण खातोय? याची चौकशी झाली पाहिजे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. गोकुळ'च्या संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपत असून त्यानंतर प्रशासक नियुक्त करून कामकाजाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे. यावेळी भाजप नेते अशोक चराटी, 'गोकुळ'चे माजी संचालक दीपक पाटील, शांताराम पाटील उपस्थित होते.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

'गोकुळ' दूध संघाशी संलग्न दूध संस्थांच्या नोंदणीबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यांच्या भेटीनंतर गैरसमज दूर होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्यांच्या पाठीमागून कोणीतरी चुकीची माहिती देत असल्यासारखे वाटते. त्यांचा बोलवता धनी कोण? असा सवालही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केला. आमदार पाटील यांनी रविवारी 'गोकुळ' दूध संघाच्या कारभारावर टीका केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी त्याला उत्तर दिले.

Web Title : गोकुल आरोप: शिवाजीराव पाटिल का आरोप, हसन मुश्रीफ का स्पष्टीकरण

Web Summary : शिवाजीराव पाटिल ने गोकुल दूध संघ में भ्रष्टाचार का आरोप लगाया, नई पंजीकरणों की जांच की मांग की। हसन मुश्रीफ ने दावों का खंडन किया, गलत सूचना का संदेह जताया। पाटिल ने प्रशासक नियुक्ति और ईडी जांच की मांग की।

Web Title : Gokul Allegations: Shivajirao Patil Accuses, Hasan Mushrif Clarifies on Corruption

Web Summary : Shivajirao Patil alleges corruption in Gokul milk union, demanding inquiry into new registrations. Hasan Mushrif refutes claims, suspecting misinformation. Patil seeks administrator appointment and ED investigation.