मिरजेच्या तरुणाची नृसिंहवाडीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST2021-03-30T04:13:28+5:302021-03-30T04:13:28+5:30

नृसिंहवाडी : वडिलांच्या वाढदिवसादिवशीच मुलाने नृसिंहवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. अमित राजेंद्र आमटे (वय ३६, रा. गुलमोहर कॉलनी ...

Mirza's youth commits suicide in Nrusinhwadi | मिरजेच्या तरुणाची नृसिंहवाडीत आत्महत्या

मिरजेच्या तरुणाची नृसिंहवाडीत आत्महत्या

नृसिंहवाडी : वडिलांच्या वाढदिवसादिवशीच मुलाने नृसिंहवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. अमित राजेंद्र आमटे (वय ३६, रा. गुलमोहर कॉलनी मिरज) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून याबाबतची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अमित आमटे याने शनिवारी उपवास असल्याने घरातून खिचडीचा डबा घेऊन नोकरीस जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता.

रविवार (दि. २८) फाल्गुन पौर्णिमा असल्याने तो नृसिंहवाडी येथे आला होता. त्याने रात्री उशिरा मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या दशक्रिया विधी सभागृहाजवळील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी शिरोळ पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना संपर्क करुन आत्महत्येची माहिती दिली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. काही दिवस अमित तणावाखाली होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. वडील राजेंद्र यांच्या वाढदिनीच त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने आमटे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

फोटो - २९०३२०२१-जेएवाय-०७-अमित आमटे

Web Title: Mirza's youth commits suicide in Nrusinhwadi