Kolhapur: इन्स्टाग्रामवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:05 IST2025-07-12T18:04:37+5:302025-07-12T18:05:15+5:30
हातकणंगले : मजले (ता हातकणंगले) गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारी राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख करून तिच्यावर गेली ...

Kolhapur: इन्स्टाग्रामवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा
हातकणंगले : मजले (ता हातकणंगले) गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारी राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख करून तिच्यावर गेली सहा महिने अत्याचार करणाऱ्या अभिषेक आवळे (वय २६ रा. बेघर वसाहत उदगाव ) आणि शुभम सुकेवेंद्र पटेल (२१, रा.मध्यप्रदेश ) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी, संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचे नातेवाईक कर्नाटक राज्यातील आहेत. ते मजले येथील पेट्रोल पंपाशेजारी एका भाड्याच्या खोलीत राहतात. पीडित मुलीची अभिषेक याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून अभिषेकने संबंधित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या प्रकाराची माहिती पंपाशेजारी असलेल्या हॉटेलमधील कामगार शुभम पटेल याला लागली. त्याने संबंधित मुलीस ब्लॅकमेल करून अत्याचार केले. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच तिने हातकणंगले पोलिसात दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे . रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.