कोल्हापूर : दुकानातून तंबाखूची पुडी आणण्याच्या निमित्ताने घरी बोलवून ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी शशिकांत याकुब घाटगे (वय ४०, रा. श्रीराम कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर) याला त्वरित अटक केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद देताच पोलिसांनी कारवाई केली. घाटगे हा खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचे काम करतो.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. रविवारी सायंकाळी संशयित आरोपीने तंबाखूची पुडी आणण्याच्या निमित्ताने ११ वर्षीय मुलीस स्वत:च्या घरी बोलवून घेतले. घरामागे असलेल्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले.
घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार आईला सांगितला. नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने संशयित आरोपी घाटगे याला त्याच्या घरातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याची गुरुवारपर्यंत (दि. ५) पोलिस कोठडीत रवानगी झाली.घाटगे हा राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचे काम करतो. त्याची पत्नीही त्याच रुग्णालयात सेवाशुश्रूषेचे काम करते. त्याची मुले शालेय शिक्षण घेतात. त्याने केलेल्या किळसवाण्या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Summary : In Kolhapur, a 40-year-old man was arrested for abusing an 11-year-old girl he lured home to buy tobacco. The incident occurred on Sunday evening. The accused, a hospital ward boy, is now in police custody. The crime has caused outrage in the area.
Web Summary : कोल्हापुर में, एक 40 वर्षीय व्यक्ति को 11 वर्षीय लड़की को तंबाकू खरीदने के बहाने घर बुलाकर दुष्कर्म करने के आरोप में गिरफ्तार किया गया। घटना रविवार शाम को हुई। आरोपी, एक अस्पताल का वार्ड बॉय, अब पुलिस हिरासत में है। इस अपराध से इलाके में आक्रोश है।