केंद्रातील स्वतंत्र सहकार मंत्रालय लाभदायक : वाबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:22+5:302021-09-14T04:30:22+5:30

संस्थापक सुरेश गडगे म्हणाले, केंद्रातील स्वतंत्र सहकार विभागामुळे मल्टिस्टेट संस्थांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील, तसेच मल्टिस्टेट संस्थांना ...

Ministry of Independent Co-operation at the Center Beneficial: Wabele | केंद्रातील स्वतंत्र सहकार मंत्रालय लाभदायक : वाबळे

केंद्रातील स्वतंत्र सहकार मंत्रालय लाभदायक : वाबळे

संस्थापक सुरेश गडगे म्हणाले, केंद्रातील स्वतंत्र सहकार विभागामुळे मल्टिस्टेट संस्थांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील, तसेच मल्टिस्टेट संस्थांना भेडसावणारा थकीत कर्जवसुलीचा प्रश्न केंद्रीय निबंधक यांच्याकडे फेडरेशनच्या वतीने मांडता येईल.

याप्रसंगी केंद्रीय सहकारमंत्री व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मल्टिस्टेट संस्थांच्या वसुलीसाठी संस्थेस अधिकार प्राप्त व्हावेत यासाठीचा मसुदा सादर करणार असल्याचे फेडरेशनचे संस्थापक ॲड. सुरेश गडगे यांनी सांगितले. संस्थेचे माजी चेअरमन सुकुमार पाटील यांनी कर्मवीर मल्टिस्टेटने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

चेअरमन अनिल भोकरे यांनी फेडरेशन करीत असलेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले. संचालक प्रा डी.ए. पाटील, अरविंद मजलेकर, भूपाल गिरमल, विजय आवटी, कुमार पाटील, रमेश पाटील, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन वाडगे आणि संस्थेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते

Web Title: Ministry of Independent Co-operation at the Center Beneficial: Wabele