Kolhapur-Local Body Election: कागल नगरपालिकेत मंत्री मुश्रीफांच्या स्नुषा सेहरनिदा यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:23 IST2025-11-19T16:21:36+5:302025-11-19T16:23:36+5:30
मुश्रीफ-घाटगे यांची युती झाल्याने विरोधात माजी खासदार संजय मंडलिक लढत आहेत

Kolhapur-Local Body Election: कागल नगरपालिकेत मंत्री मुश्रीफांच्या स्नुषा सेहरनिदा यांची बिनविरोध निवड
कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष अध्यक्ष समरजित घाटगे यांची युती झाल्याने मोठी उलाथापालथ झाली. दरम्यानच आज, बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी प्रभाग नऊ मधील दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधु माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत.
वाचा : पन्हाळा नगरपरिषदेत सतीश भोसलेंची बिनविरोध निवड
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नुरजहॉ निसार नायकवडी व अपक्ष मोहबतबी अब्दुलरशीद शेख यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची अताषबाजी करीत विजयाच्या घोषणा दिल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ-घाटगे यांची युती झाल्याने विरोधात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक लढत आहेत.