कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या शिल्पा शशिकांत खोत (रा.सेनापती कापशी ता.कागल) यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी कृष्णात पाटील (रा.गडमुडशिंगी ता.करवीर) यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केवळ अर्ध्या तासातील प्रशासकीय प्रक्रियेनंतर या निवडीची घोषणा केली. यानंतर जिल्हा परिषदेसमोर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आल्याने आपल्याच पक्षाला अध्यक्षपद मिळावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी ताकद पणाला लावली होती. त्यात ते यशस्वी झाले.महाविकास आघाडीच्यावतीने कॉंग्रेसच्या रसिका पाटील आणि संभाजी पाटणकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतू गटनेते सुधीर देसाई, संग्राम कुपेकर यांच्या विनंतीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतले. या सभागृहातील ६८ पैकी तब्बल ५१ सदस्य महायुतीकडे आहेत.गेल्या काही दिवसात सांगली आणि सातारा जिल्हा परिषदेत भाजपला एकटे पाडण्याच्या घडामोडी सुरु असताना कोल्हापूरच्या अध्यक्ष निवडीबाबतही संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतू रविवारी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदासाठी त्यांच्याच तालुक्याला प्राधान्य दिले असून सव्वा वर्षासाठी या निवडी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
Web Summary : Shilpa Khot of NCP elected Kolhapur Zilla Parishad President, BJP's Tanaji Patil Vice-President. Minister Hasan Mushrif secured the position for his party. Mahavikas Aghadi withdrew nominations. The election saw celebrations after the result.
Web Summary : एनसीपी की शिल्पा खोत कोल्हापुर जिला परिषद की अध्यक्ष चुनी गईं, बीजेपी के तानाजी पाटिल उपाध्यक्ष बने। मंत्री हसन मुश्रीफ ने अपनी पार्टी के लिए पद सुरक्षित किया। महाविकास अघाड़ी ने नामांकन वापस ले लिया। परिणाम के बाद जश्न मनाया गया।