गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील नगरपालिकेवरील जनता दलाचे अनेक वर्षांपासूनचे वर्चस्व अखेर संपुष्टात आणले.गेल्यावेळी स्वतंत्रपणे लढून नगरपालिकेची सत्ता एकहाती अबाधित राखलेल्या जनता दलाने यावेळी जनसुराज्य,भाजप व शिंदेसेनेशी युती करून लढवली. मात्र, शहरवासियांनी 'राष्ट्रवादी'वरच विश्वास दाखवल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबीटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनता दल, जनसुराज्य शक्ती, भाजप, शिंदेसेना महायुतीला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले.नगरसेवकपदाच्या एकूण २२ पैकी राष्ट्रवादीला १७,जनता दलाला ३,भाजप व जनसुराज्य शक्तीला प्रत्येकी १ जागा मिळाली.२२ पैकी तब्बल १७ चेहरे नवीन आहेत.विद्यमान ५ नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली असून त्यामध्ये जनता दलाच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी व नितीन देसाई, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर,रुपाली परीट यांचा समावेश आहे.नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तुरबतमठ यांनी एकतर्फी विजय मिळवला.त्यांनी जनसुराज्य शक्तीच्या गंगाधर हिरेमठ यांचा ४२४२ मतांच्या फरकाने पराभव केला.तुरबतमठ यांना १२३५० तर हिरेमठ यांना ८०५६ मते मिळाली.निकालानंतर आयोजित विजयी सभेत मंत्री मुश्रीफ यांनी शहरवासियांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
'मनसे'चा प्रवेश 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवली. त्यांच्या पत्नी स्वाती चौगुले यांच्या रुपाने गडहिंग्लज नगरपालिकेत प्रथमच प्रवेश झाला आहे.
एका मताने विजयी प्रभाग १०(अ)मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल भमानगोळ हे केवळ एका मताने विजयी झाले.त्यांनी 'जनसुराज्य'चे उमेदवार दुंडाप्पा नेवडे यांचा पराभव केला.
पती - पत्नी विजयी राष्ट्रवादीतर्फे प्रभाग ११(अ) मध्ये उदय परीट तर प्रभाग ७ (अ)मध्ये त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रुपाली परीट या विजयी झाल्या आहेत.
Web Summary : In a historic win, NCP secured a majority in Gadhinglaj, ending Janta Dal's long-standing rule. Mahesh Turabatmuth won the mayoral race. Several new faces emerged as winners, marking a significant shift in local politics.
Web Summary : एक ऐतिहासिक जीत में, राष्ट्रवादी कांग्रेस ने गडहिंग्लज में बहुमत हासिल किया, जिससे जनता दल का लंबे समय से चला आ रहा शासन समाप्त हो गया। महेश तुरबतमठ ने महापौर का चुनाव जीता। कई नए चेहरे विजेता बनकर उभरे, जिससे स्थानीय राजनीति में एक महत्वपूर्ण बदलाव आया।