सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात मिनी बसची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:48 IST2021-02-23T18:46:06+5:302021-02-23T18:48:30+5:30
Crimenews Police Kolhapur- मिनी बसने दुचाकीला पाठीमागून किरकोळ धडक दिली. तशी अज्ञाताने मीनी बसच्या काचा फोडल्या, गोंधळ उडाला, हे तोडफोडीचे कृत्य दुचाकीचालकानेच केल्याचा गैरसमज होऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली, हा प्रकार मंगळवारी दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोल्हापूरात सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात मिनी बसची केलेली तोडफोड.
कोल्हापूर : मिनी बसने दुचाकीला पाठीमागून किरकोळ धडक दिली. तशी अज्ञाताने मीनी बसच्या काचा फोडल्या, गोंधळ उडाला, हे तोडफोडीचे कृत्य दुचाकीचालकानेच केल्याचा गैरसमज होऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली, हा प्रकार मंगळवारी दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने सुमारे पाऊण तास परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी मिनीबस यादवनगर परिसरात काही प्रवाशांना सोडून सुभाषरोड मार्गे सावित्रीबाई हॉस्पीटल चौकातून पुढे जात होती. याचवेळी त्या मीनी बसची पुढील एका दुचाकीला किरकोळ धडक लागली.
या धडकेत दुचाकीची नंबर प्लेट तुटली. त्याचवेळी रस्त्यावरील एका अज्ञाताने दुचाकीला धडक बसल्याचे निमीत्त पुढे करुन मीनी बसची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. नागरीक मोठ्या प्रमाणावर जमा झाले. त्यावेळी ही तोडफोड संबधीत दुचाकीचालकानेच केली, या गैरसमजूतीतून नागरीकांनी त्या दुचाकीचालकाना बेदम मारहाण केली.
नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. पोलीसही तातडीने घटनास्थळी धावले, त्यांनी नागरीकांच्या मारहाणीतून दुचाकीचालकाची सुटका केली. त्यामुळे तणाव निवळला.