शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सव्वालाख नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

कोल्हापूर : यंदाच्या महापुरात बाधित झालेल्या १८६ गावांतील १ लाख २८ हजार २७६ जणांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महसूल ...

कोल्हापूर : यंदाच्या महापुरात बाधित झालेल्या १८६ गावांतील १ लाख २८ हजार २७६ जणांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महसूल प्रशासन तयार करीत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गावांच्या स्थलांतरासाठी १५०७ हेक्टर जमिनीची गरज आहे. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सरकारने मान्यता दिल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे महापूर आला. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने डोंगरालगतच्या गावांना धोका निर्माण झाला. डोंगर खचण्याचे प्रकार झाले. यामुळे पूरग्रस्त आणि धोकादायक गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने केला आहे. गावनिहाय स्थलांतर करण्याची आवश्यकता असलेली कुटुंबे, त्यामधील सदस्य यांची माहिती घेतली आहे. पुनर्वसनासाठी त्याच गावात सरकारी जमीन उपलब्ध असल्याचा गट नंबर आणि जमिनीचे क्षेत्र एकत्रित केले आहे. महसूल प्रशासन असा प्रस्ताव केला तरी संबंधित ग्रामस्थांची कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी संमती महत्त्वाची ठरणार आहे. वर्षानुवर्ष आम्ही राहत असलेल्या ठिकाणीच आमची शेती आहे, रोजगार आहे, उद्योग आहे, त्यामुळे आम्ही गाव सोडणार नाही, अशी भूमिका घेतल्यास महसूल विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाला केराची टोपलीची किंमत राहणार आहे. दरम्यान, करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीच्या पुनर्वसनासाठी १९८९ सरकारने पर्यायी ९० एकरची जागा दिली, पण अजूनही सर्व ग्रामस्थ पुनर्वसनाच्या जागेत स्थलांतर झालेले नाहीत. हा अनुभव महसूल प्रशासनालाही आला असला तरी प्रत्येक वर्षी बाधित गावांना नुकसानभरपाई देण्याऐवजी कायमचे पुनर्वसन केलेले चांगलेे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

चौकट

सर्वाधिक गावे शिरोळ तालुक्यातील

पुनवर्सनासाठीचे प्रस्तावित गावांची संख्या तालुकानिहाय अशी कंसात लोकसंख्या : करवीर १ (१३२९), गगनबावडा २५ (२३७०), पन्हाळा ६ (३८९२), शाहूवाडी २१ (६६९४), हातकणंगले १३ (१२२७६), शिरोळ ३८ (८६८४०), कागल ५ (३५८४), भुदरगड १२(१३९९), आजरा १(२४), गडहिंग्लज २५(७३४८), चंदगड ३९(२५२०).

चौकट

शासकीय जमिनीवर अतिक्रमण

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारची जमीन आहे, पण त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ते काढण्यासाठी गेल्यानंतर गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील राजकीय लोकांचा शासकीय यंत्रणेवर दबाव वाढतो. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे पूरग्रस्तांना खुल्या जमीन मिळण्यात अडचणी येत आहेत.

कोट

पूरग्रस्त आणि डोंगरालगतच्या धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.

श्रावण क्षीरसागर,

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी.