शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हैशी, कोल्हापूरात रंगला म्हैशींंचा अनोखा ‘रोड शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 18:49 IST

मालकाने दिलेली हाक, हलगीचा कडकडाट अन् सायलेन्सर काढून कानठळ्या बसविणारा आवाज करणाऱ्या दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हशी अशा उत्साहात शुक्रवारी सागरमाळ परिसरात म्हैसपूजनाचा थरार रंगला. विशेष म्हणजे जन्नती, पवन, सरदार, राणी, लक्ष्या, उडान, राजा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देसागरमाळात रंगला म्हशींंचा ‘रोड शो’ ; जन्नती, पवन, सरदार, राणी, उडान यांनी वेधले लक्षमराठा आरक्षणाचा मुद्दा येथेही; हलगीचा कडकडाट

कोल्हापूर : मालकाने दिलेली हाक, हलगीचा कडकडाट अन् सायलेन्सर काढून कानठळ्या बसविणारा आवाज करणाऱ्या दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हैशी अशा उत्साहात शुक्रवारी सागरमाळ परिसरात म्हैसपूजनाचा थरार रंगला. विशेष म्हणजे जन्नती, पवन, सरदार, राणी, लक्ष्या, उडान, राजा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या अनोख्या रोड शोचे आयोजन दीपावली पाडव्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा म्हैस व दुग्ध व्यावसायिकधारक असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. हा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाल्याने सागरमाळ, रेड्याची टक्कर हा परिसर अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता.पाडव्यानिमित्त पंचगंगा घाट, शनिवार पेठ, गवळी गल्ली, सम्राट चौक, कसबा बावडा, आदी ठिकाणी म्हैसपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी सागरमाळ परिसरातील सागरोबा देवस्थान येथे म्हैसपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यानिमित्त म्हैसमालकांनी आपल्या म्हशींना पंचगंगा नदीघाटावर स्नान घालून त्यांना रंगीबेरंगी रंगांनी रंगवून, शिंगांवरही मोरपिसांसह रंगीबेरंगी फुगे, रिबन बांधून, अंगावर झूल टाकून या रोड शोमध्ये आणले होते. गुरुवारी (दि. ८) असा शो शनिवार पेठेतही झाला; तर शुक्रवारी दुपारी मालकाच्या एका हाकेत म्हैसमालकाजवळ पळत येणे, मोटारसायकलसोबत रेडकू व म्हैस पळविणे, म्हशीने देवाला नमस्कार करणे, म्हैस दोन पायांवर उभी राहणे, अशा एक ना अनेक थरारक कसरती या शोमध्ये सादर करण्यात आल्या.

गेले २५ वर्षांहून अधिक काळ असा शो अर्थात म्हैसपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही परंपरा आजही जिल्हा म्हैस व दुग्ध व्यावसायिकांनी जपली आहे. हा शो पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. गर्दीत अचानक फिरणाऱ्या म्हशी आणि बघ्यांची पळापळ अशा थरारात हा शो रंगला होता. यात म्हैस अंगावर येईल आणि कधी धडक बसेल याचा नेम नाही, असे वातावरण असूनही हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील (करंबेकर) यांनी स्वागत केले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते मानाचा नारळ देऊन म्हैसमालकांचा सत्कार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक काका पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब चिले, राजू पाटील, राजू भोसले, विजय चौगुले, हरिभाऊ पायमल, पिंटू भोसले, गोगा पसारे, रंगराव गाडगीळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

यांच्याकडे सर्वांचे लक्षरणजित गवळी यांच्या ‘जन्नती’च्या पाठीवर ‘मराठा आरक्षण देताय का इस्कटू?’ व दुसऱ्या बाजूला ‘आरक्षणातील शहिदांना आदरांजली,’ असे शब्द रंगविले होते. त्यामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ह ोते; तर सदाशिव गवळींच्या धष्टपुष्ट ‘पवन’नेही आपल्या आकर्षक रंगसंगती व थरारक प्रात्यक्षिकांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे बावरी, लक्ष्या, राणी, उडान, सरदार, राजा, पाडस, चांदी, चंदी, बाबू या म्हशींनी तर सर्वांचे मनोरंजन करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर