कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:03 IST2025-06-09T17:03:12+5:302025-06-09T17:03:58+5:30

अनेकांचा शिंदेसेनेत प्रवेश

Meeting with Chief Minister soon for extension of Kolhapur boundary, Guardian Minister Prakash Abitkar gave information | कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत अंतिम निर्णय करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. शाहू स्मारक भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

आबिटकर म्हणाले, ‘राज्य सरकार हद्दवाढीच्या निर्णयाबद्दल पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. काही दिवसांपूर्वी नवीन राजवाडा येथे खासदार शाहू छत्रपती यांच्यासह आमची बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे लवकरच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासमवेत बैठक होणार आहे. कोरानाच्या रुग्णांबाबत आबिटकर म्हणाले, ‘कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात कोरोनाची सौम्य लाट आहे. जे रुग्ण कोरोनामुळे मयत झाले आहेत त्या रुग्णांना अन्य आजारही असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये.’

अनेकांचा शिंदेसेनेत प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच भूमिकेतून आम्ही वाटचाल करत आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमचे नेते आणि पदाधिकारी आपचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शिंदेसेनेत अनेकांचा लवकरच प्रवेश होईल, असे आबिटकर म्हणाले.

Web Title: Meeting with Chief Minister soon for extension of Kolhapur boundary, Guardian Minister Prakash Abitkar gave information