बाजार समितीकडून सभा कायद्याची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:30+5:302021-09-23T04:26:30+5:30

(बाजार समिती लोगो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची सभा रविवारी (दि. २६) होत ...

Meeting law trampled by market committee | बाजार समितीकडून सभा कायद्याची पायमल्ली

बाजार समितीकडून सभा कायद्याची पायमल्ली

(बाजार समिती लोगो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची सभा रविवारी (दि. २६) होत आहे. पणन कायद्या कलम ३७ मधील तरतुदीनुसार सभेपूर्वी संलग्न सभासदांना चौदा दिवस अगोदर सभेची नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, समिती प्रशासनाने आठ दिवस अगोदर नोटीस देऊन कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप संस्था व ग्रामपंचायत प्रतिनिधींमधून होत आहे.

सहकारी संस्थांमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेला खूप महत्त्व आहे. संस्थेच्या धोरणात्मक निर्णयाची चर्चा सभेत होऊन मान्यता घ्यावी लागते. या सभेला उपस्थित राहण्यासाठी सभासदांना आठ दिवस अगोदर नोटीस पाठविणे कायद्याने बंधनकारक असते. तसे झाले नाहीतर संस्था प्रशासनावर कारवाई होऊ शकते. सहकाराप्रमाणेच पणन कायद्यानुसार बाजार समित्यांच्या सभांबाबतही काही नियमावली बनविली आहे. ‘पणन’ कायद्या कलम ३७ मधील तरतुदीनुसार बाजार समित्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी किमान चौदा दिवस संलग्न सभासदांना नोटिसीने कळविणे बंधनकारक आहे.

काेल्हापूर बाजार समितीची रविवारी सभा होत आहे. तत्पूर्वी चौदा दिवस म्हणजे १३ सप्टेंबरपूर्वी सभासदांना नोटीस पाठविणे अथवा ती प्रसिद्ध करणे कायद्याने अपेक्षित होते. मात्र, कोल्हापूर बाजार समितीच्या अशासकीय मंडळाने चक्क आठ दिवसांपूर्वी नोटीस काढून ऑनलाईन सभेचे आयोजन केले आहे. साडेसहा तालुक्यांतील विकास संस्था, ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींसह हमाल, तोलाईदार, व्यापारी असे हजारो सभासद समितीशी संलग्न आहेत. यातील सभासद सभेला उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र, समिती प्रशासनाकडून तसे झाले नसून सभा कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप संस्थांमधून होत आहे.

कोट-

समितीच्या सभासदांना ११ सप्टेंबरला सभेच्या नोटिसा काढल्या आणि त्या १३ सप्टेंबरला पोस्टात टाकल्या आहेत.

- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)

Web Title: Meeting law trampled by market committee