Kolhapur: गर्भलिंग निदान रॅकेट; मेडिकल चालक अटकेत; गोळ्यांची विक्री, पुरवठादाराचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:39 IST2025-02-05T11:38:52+5:302025-02-05T11:39:39+5:30

कोल्हापूर : फुलेवाडी येथील बोगस डॉक्टर दगडू बाबूराव पाटील याला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा मेडिकल चालक योगेश शंकर निगवेकर ...

Medical driver arrested in connection with sex diagnosis racket in Kolhapur | Kolhapur: गर्भलिंग निदान रॅकेट; मेडिकल चालक अटकेत; गोळ्यांची विक्री, पुरवठादाराचा शोध सुरू

Kolhapur: गर्भलिंग निदान रॅकेट; मेडिकल चालक अटकेत; गोळ्यांची विक्री, पुरवठादाराचा शोध सुरू

कोल्हापूर : फुलेवाडी येथील बोगस डॉक्टर दगडू बाबूराव पाटील याला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा मेडिकल चालक योगेश शंकर निगवेकर (वय ४२, रा. गंगावेश, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी (दि. ४) अटक केली. या गुन्ह्यातील पाचव्या संशयितास अटक झाली. मेडिकल चालकास गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागासह पोलिसांनी फुलेवाडी, जुना बुधवार पेठ आणि ज्योतिबा डोंगर येथे छापे टाकून कारवाई केली होती. २० डिसेंबर २०२४ रोजी केलेल्या कारवाईत बोगस डॉक्टर दगडू पाटील याच्यासह चौघांना अटक केली. या टोळीला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू होता.

गंगावेशीतील दत्त मेडिकलचा मालक योगेश निगवेकर यानेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी मंगळवारी त्याला घरातून अटक केली. त्याने किती जणांना आणि किती गोळ्यांची विक्री केली, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Medical driver arrested in connection with sex diagnosis racket in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.