शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

मते विकत घेण्यास यंत्रणा झाली सक्रिय

By admin | Updated: October 11, 2014 00:26 IST

विधानसभा : दिवाळीपूर्वीच पैशांचा पाऊस

कोल्हापूर : मतदानासाठी आता अखेरचे फक्त चारच दिवस राहिले असल्याने विखारी प्रचारासह थेट मतेच विकत घेण्यासाठी मातब्बर उमेदवारांची यंत्रणा कामास लागली आहे. आचारसंहिता, पोलिसांच्या तपासण्या आणि विरोधी उमेदवाराचा पहारा असूनही या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत दिवाळीपूर्वीच पैशांचा पाऊस पडणार, हे स्पष्टपणे दिसत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. १५) मतदान होत आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत टोकाच्या विखारी प्रचारावरच भर देण्याचे नियोजन बहुतेक उमेदवारांनी केले आहे. त्यासाठी विरोधी उमेदवाराची कुंडली शोधून काढण्यासाठी प्रत्येकाने यंत्रणा कामास लावली आहे. आरोप करताना चर्चा होईल एवढेच पाहिले जात आहे. ते आरोप खरे आहेत की खोटे, याची खातरजमा करण्यास कुणाला वेळ नाही. त्याच्या फंदातही कोण पडायला तयार नाही. मतदारसंघ कोणताही असला तरी लढतीत प्रचंड चुरस आहे. त्यामुळे चार-दोन हजार मतांचाच खेळ आहे. कागल, राधानगरीसारख्या काही मतदारसंघांत तर त्याहून कमी विजयी मताधिक्य असू शकेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रचाराच्या अस्त्राच्या पलीकडे जाऊन थेट पैशांचे अस्त्र बाहेर काढण्याची तयारी उमेदवारांकडून सुरू झाली आहे. आज दुपारीच शहराच्या पूर्वेकडील गावांतील एका गटाचा प्रमुख कार्यकर्ता भेटला होता. त्याला नेत्यांनी बोलावून घेतले होते. गावांत आपल्याला किती मते मिळतील अशी विचारणा या नेत्याने केली. त्या कार्यकत्याने ‘साहेब, आम्ही पन्नास टक्के आहे म्हटल्यावर पन्नासचे साठ टक्के करण्यासाठी मताला किती पैसे द्यायचे तेवढे सांगा व तेवढे पैसे घेऊन जावा,’ असा थेट निरोपच दिला. त्या कार्यकर्त्यालाही काही क्षण काही समजले नाही. हीच स्थिती एक-दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता सगळ्याच मतदारसंघांत राहील, अशी स्थिती आहे. तशी आर्थिक ताकद असलेले मातब्बर रिंगणात आहेत. पूर्वी झोपडपट्ट्यांमध्येच पैशांचे वाटप होत असे; परंतु आता इतर ठिकाणीच पैशाची मागणी वाढू लागली आहे. (प्रतिनिधी)