शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा फार्स: ‘नमामि पंचगंगा’, निधी नाही, नुसताच दंगा

By समीर देशपांडे | Updated: May 3, 2025 12:06 IST

उपाययोजना जुन्याच, शासन आदेश फक्त नवा

समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पंचगंगा शुद्धीकरणाची मागणी होत असताना, आता महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांत नदी शुद्ध करण्याचे आव्हान पेलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘नमामि पंचगंगा’ नदी कृती आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मान्यता दिली आहे. परंतु, यासाठी कोणताही स्वतंत्र निधी जाहीर करण्यात आला नसून, नियमित पद्धतीनेच कामकाज करण्याबाबतचा शासन आदेश बुधवारी काढण्यात आला आहे. याचाच अर्थ ‘नमामि पंचगंगा’ म्हणजे निधी नसतानाचा नुसता दंगा चालला आहे.

कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांची ही पंचगंगा कोल्हापूरपासून नृसिंहवाडीपर्यंत ६७ किलोमीटर वाहते. नदीकाठावरील कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेतील सांडपाणी, चार नगर परिषदा, नगरपंचायतींमधील आणि नदीकाठावरील १७४ गावांतून बाहेर पडणारे सांडपाणी घेऊन वाहत असते. काठावरील साखर कारखाने, इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातील रसायनमिश्रित पाणी यामुळे रसायनांमुळे फेसाळणारी ही पंचगंगा विषगंगा बनल्याने दरवर्षी लाखो मासे मृत होत असल्याचे वास्तव आहे.या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगा’च्या पार्श्वभूमीवर ‘नमामि पंचगंगा’ योजना राबविण्याची मागणी होत होती. त्यानुसार हा शासन आदेश काढण्यात आला आहे. यासाठी व्यापक कृती आराखडा राबविण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया सुधारणा, औद्योगिक सांडपाणी नियंत्रण, कचरा व्यवस्थापन सुधारणा व अनुषंगिक उपाययोजना करावयाच्या असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या या आराखड्यास शासनाने मान्यता दिली असून, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणांनी ही अंमलबजावणी करावी, यासाठी या सर्व संस्थांना हा आराखडा पाठवण्यात येणार आहे. या सर्व उपायोजनांची अंमलबजावणी प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाची आहे.

प्रस्ताव पाठवायचा, निधी मागायचाया आराखड्याच्या अंमलबजावणीला मान्यता देत असताना, यासाठी कोणताही स्वतंत्र निधी जाहीर करण्यात आलेला नाही. संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडे प्रस्ताव पाठवून निधी मंजूर करून घ्यायचा आहे, तसेच सामाजिक दायित्व आणि पर्यावरण दायित्व या विविध कंपन्यांकडील निधीचाही वापर या कामांसाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ही हिंमत सरकार दाखवणार कायया पंचगंगेच्या काठावर ८ साखर कारखाने आहेत. १०७ उद्योगधंदे आहेत. त्यातील रसायनयुक्त सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. ते रोखण्याची हिंमत शासन दाखवणार का, हाच खरा प्रश्न आहे. याआधीच जर या कारखान्यांवर खरोखरची कारवाई केली असती, तर पंचगंगा इतकी प्रदूषितच झाली नसती.

८५ एमएलडी पाणी प्रक्रियेविना नदीतस्थानिक स्वराज्य संस्था - निर्माण होणारे सांडपाणी  - एमएलडी प्रक्रिया क्षमता

  • कोल्हापूर महापालिका - १४९.१/१०६.७
  • इचलकरंजी महापालिका - ४०/२०
  • अन्य गावे  - १९.६९/००

कोणताही आमूलाग्र बदल नाहीजरी या आराखड्याच्या अंमलबजावणीला मान्यता दिली असली, तरी ना कोणता निधी ना कोणते अधिकार. पूर्वीप्रमाणेच विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे वरिष्ठ अधिकारी बैठका घेणार प्रस्ताव सादर होणार. जोपर्यंत युद्धपातळीवर हे काम सुरू करून यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद होत नाही, तोपर्यंत पंचगंगेच्या स्थितीत सुधारणा होईल, असे वाटत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणGovernmentसरकार