शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: पिस्तूल शोधताना सापडले २६ लाखांचे एमडी ड्रग्ज, मनीष नागोरीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:51 IST

चार जिवंत काडतुसेही सापडली, शहापूर पोलिसांची यड्रावमध्ये कारवाई

इचलकरंजी : कुख्यात आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष ऊर्फ मन्या रामविलास नागोरी (वय ३६, रा. प्रियदर्शनी हौसिंग सोसायटी, यड्राव, ता. शिरोळ) याला त्याच्या घरातून शहापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २६ लाखांच्या ८६५ ग्रॅम मेफेड्रोन एमडी ड्रग्जसह चार जिवंत काडतुसे, एक चारचाकी, असा ३० लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा गुन्हा पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे इचलकरंजीसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.शहरात दोन दिवसांपूर्वी सांगली रोडवर गोळीबाराची घटना घडली. या घटनेत वापरलेल्या पिस्तूलचा शोध घेण्याच्या निमित्ताने नागोरी याच्याकडे तपास करण्यासाठी शहापूर पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले. त्यावेळी त्याने अर्धा तास पोलिसांना बाहेर ताटकळत ठेवले. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहता पोलिसांना त्याच्यावर अधिकच संशय बळावला. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना दोन हजार किमतीची चार जिवंत काडतुसे हाती लागली.याबाबतची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक जाधव व उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही तेथे पोहोचले. संपूर्ण घराची झडती घेऊनही पिस्तूल सापडत नसल्याने पोलिसांनी वाहनांच्या तपासणीचा निर्णय घेतला.पोलिसांनी त्याच्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये प्लास्टिक पिशवीत ठेवलेला १४३ ग्रॅम वजनाचा ४ लाख २९ हजार रुपये किमतीचा मेफेड्रोन मिळून आला. दुसऱ्या गाडीत ७२२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन मिळून आला. त्याची किंमत २१ लाख ५५ हजार आहे. पोलिसांनी या कारवाईत एक चारचाकी, एक दुचाकी, इलेक्ट्रिक वजनकाटा, डीव्हीआर, असा एकूण ३० लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नागोरी याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून, त्याने हे अमली पदार्थ कोठून आणले? पुढे कोणाला दिले जातात, या साखळीची तपासणी केली जाणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.नागोरीच्या घराच्या परिसरातही होणार तपासनागोरी याने पोलिसांना अर्धा तास घरामध्ये येऊ दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. घरामध्ये केलेल्या तपासणीमध्ये फक्त चार जिवंत काडतुसे मिळाली, पण पिस्तूल मिळाले नाही. त्याने पोलिसांना अडवून ठेवलेल्या अर्ध्या तासाच्या कालावधीत काहीतरी संशयास्पद हालचाली केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे घराच्या परिसरात त्याने काही फेकून दिले अथवा लपवून ठेवले आहे काय, याचाही तपास केला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: MD Drugs worth 2.6 million seized, Nagori arrested.

Web Summary : Police arrested Manish Nagori in Ichalkaranji, seizing ₹30.22 lakh worth of MD drugs, live cartridges, and a car. Nagori delayed police entry, raising suspicion. Investigation continues to uncover the drug network's source and distribution.