शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवड आज होणार

By admin | Updated: July 4, 2015 00:50 IST

उपमहापौरही देणार राजीनामा : डकरेंच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

कोल्हापूर : काँग्रेसला पाच महिने उशिरा का होईना अखेर महापौरपद मिळाले. शहराच्या ४२ व्या महापौर म्हणून वैशाली डकरे यांच्या निवडीवर आज, शनिवारी होणाऱ्या विशेष सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता ही सभा होत आहे. याच सभेतच काँग्रेसचे उपमहापौर मोहन गोंजारे व प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते राजीनामा देणार आहेत.तृप्ती माळवी यांचा लाचखोर प्रकरणानंतर राजीनामा लांबविल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे खांदेपालट होणारे शिक्षण मंडळ सभापती व उपमहापौरपदही लांबले. आता नवीन महापौरांची निवडीची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे उपमहापौर गोंजारे व शिक्षण मंडळ सभापती मोहिते राजीनामा सादर करणार आहेत. उपमहापौर निवडीचा कार्यक्रम महापौर निवडीप्रमाणेच विभागीय आयुक्तांकडून जाहीर होईल.आज, शनिवारी वैशाली डकरे या नूतन महापौर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर लगेच दुपारी चार वाजता नूतन महापौर व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश व्हावा, या पाठपुराव्यासाठी तयारीच्या अनुषंगाने महापालिकेत बैठकीचे आयोजन केले आहे.न्यायालय निर्णयाची धास्तीनगरसेवकपद रद्दच्या शासनाने केलेल्या कारवाईस स्थगिती मिळावी, यासाठी माळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सोमवारचा निर्णय महापौर निवडीस बंधनकारक राहील, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे नवीन महापौरांची निवडीनंतर कायदेशीर पेच निर्माण होण्याची धास्ती अनेकांना सतावत आहे.सभापतिपदी महेश जाधव निश्चितशिक्षण मंडळ सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडे दुसरा उमेदवारच नसल्याने महेश जाधव यांची निवड निश्चित आहे. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे जालंधर पवार, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, ज्योत्स्ना पवार-मेढे, आदी इच्छुक आहेत. इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.