शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची सुनावणी पाच मिनिटांत पूर्ण

By admin | Updated: June 11, 2015 01:06 IST

लाच प्रकरण : निर्णय राखीव; उच्च न्यायालयात जाण्याची तयारी

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणावरून नगरसेवकपद रद्द करण्याबाबत बुधवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. महापौर तृप्ती माळवी, आयुक्त पी. शिवशंकर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक पद्मा कदम यांनी बाजू मांडली. मंत्री डॉ. पाटील यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले. मात्र, या प्रकरणी निर्णय राखीव ठेवला. निर्णय कधी जाहीर होणार, हे स्पष्ट नसले तरी महापौरांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री पाटील यांनी अवघ्या पाच मिनिटांत सुनावणी आटोपली.स्वीय सहायकामार्फत १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ३० जानेवारीला महापौर तृप्ती माळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. अटकेच्या नामुष्कीनंतरही महापौर माळवी यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला. त्यामुळे महापौरांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस सभागृहाने ठरावाद्वारे केली. त्याबाबत राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी पूर्ण झाली.मंत्री पाटील यांनी सर्वांत प्रथम आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून माहिती घेतली. महापौर माळवी यांनी, या प्रकरणी न्यायालयाने आपणास दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे कारवाई करणे उचित नाही, असे स्पष्ट केले. म्हणणे ऐकून घेऊन डॉ. पाटील यांनी लवकरच सुनावणीचा निकाल जाहीर होईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)५राज्यमंत्र्यांकडे महापौर लाचप्रकरणी सुनावणी होणार असल्याने प्रशासनासह नगरसेवकांत उत्सुकता होती. प्रशासनातर्फे आयुक्त पी. शिवशंकर हजर होते. मात्र, राज्यमंत्र्यांच्या दालनात फक्त पाच मिनिटांत सुनावणी आटोपली.