शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाचा ‘लोभ’स काटेरी मुकुट!

By admin | Updated: November 16, 2015 00:44 IST

महापालिकेचे राजरंग : महापौरपदाची खांडोळी; माळवी प्रकरणाने बदनामी

तानाजी पोवार --कोल्हापूर महानगरपालिकेत एकदा महापौर झाल्यानंतर पुन्हा त्यांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी जनतेनेच नाकारले आहे. त्याला फक्त कांचन कवाळे याच अपवाद आहेत. याचाच अर्थ असा की, महापौर म्हणजे महानगरपालिकेच्या राजकारणातून निवृत्ती घेतल्याचा प्रकार आहे. याशिवाय तीन महिन्यांचा महापौर व तृप्ती माळवी लाच प्रकरणाने महानगरपालिकेची बदनामी झाली असल्याचेही नमूद करावे लागेल. हे पद म्हणजे काटेरी मुकुटच आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४२व्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांची निवड निश्चित आहे. भाजप-ताराराणी आघाडी विरोधी बाकांवर बसण्यास तयार असली, तरीही त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटांतील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता कायम आहे. आज, सोमवारी या निवडीवर शिक्कामोर्तब होत आहे.विधानसभेची अधुरी स्वप्नेमहापौरपदानंतर विधानसभा हेच प्रत्येकाचे स्वप्न असते. अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. शामराव शिंदे, आर. के. पोवार या माजी महापौरांसह नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी विधानसभेच्या निवडणुका लढविल्या; पण त्यांना निराशाच प्राप्त झाली. १९८९ मध्ये रामभाऊ फाळके यांनी शहराच्या पाणीप्रश्नासाठी महापौरपदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला. त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविली. पहिल्या महिला महापौरमहिला आरक्षण आल्यानंतर पहिल्या महिला महापौरपदाचा मान हा १९९४ मध्ये जयश्री बबेराव जाधव यांनी मिळविला. तत्पूर्वी पहिल्या महिला उपमहापौरपदाचा मान अ‍ॅड. मालती आनंदराव हळदकर यांनी १९९० मध्ये मिळविला. अल्पसंख्याक व दलित महापौर‘बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार’ अशी घोषणा करून १९९८ मध्ये महादेवराव महाडिकांच्या ताराराणी आघाडीविरोधात शिवसेनेच्या साथीने गनिमी कावा करून बाबू फरास यांनी सुरुंग लावला. अल्पमतातील कांचन कवाळे महापौर झाल्या. पुढील वर्षी स्वत: बाबू फरास हे महापौर बनले. तत्पूर्वी १९९० मध्ये रघुनाथ बावडेकर यांना महापौरपदाची संंधी देऊन दलित समाजाला मान दिला.पती-पत्नी, पिता-पुत्रमहापौर-उपमहापौरसन १९९२-९३ मध्ये बंडोपंत नाईकवडे महापौर, तर त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे उपमहापौरपदी एकाच वेळी विराजमान झाल्याची ही एकमेव घटना आहे. १९८० मध्ये दत्तात्रय कणेरकर यांना महापौरपद, तर त्यांचे पुत्र शिरीष कणेरकर यांना २०११ मध्ये हेच पद मिळाले. १९८५ मध्ये धोंडिराम रेडेकर यांना महापौरपद, तर त्यांच्या पत्नी सुशीला रेडेकर यांना १९९९ ला उपमहापौरपद मिळाले. कांचन कवाळे (१९९८) व त्यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे (२०११) यांनीही महापौरपद मिळाले. तसेच जयश्री सोनवणे यांनी २०१३ मध्ये महापौरपदावर काम केले. त्यांचे पती हरिदास सोनवणे (२००३), सासरे रामकृष्ण सोनवणे (१९८८) यांनी उपमहापौरपदावर काम केले आहे.पती-पत्नी, पिता-पुत्रमहापौर-उपमहापौरसन १९९२-९३ मध्ये बंडोपंत नाईकवडे महापौर, तर त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे उपमहापौरपदी एकाच वेळी विराजमान झाल्याची ही एकमेव घटना आहे. १९८० मध्ये दत्तात्रय कणेरकर यांना महापौरपद, तर त्यांचे पुत्र शिरीष कणेरकर यांना २०११ मध्ये हेच पद मिळाले. १९८५ मध्ये धोंडिराम रेडेकर यांना महापौरपद, तर त्यांच्या पत्नी सुशीला रेडेकर यांना १९९९ ला उपमहापौरपद मिळाले. कांचन कवाळे (१९९८) व त्यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे (२०११) यांनीही महापौरपद मिळाले. तसेच जयश्री सोनवणे यांनी २०१३ मध्ये महापौरपदावर काम केले. त्यांचे पती हरिदास सोनवणे (२००३), सासरे रामकृष्ण सोनवणे (१९८८) यांनी उपमहापौरपदावर काम केले आहे.घरात दोन नगरसेवकपदेबंडोपंत नाईकवडे आणि त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे, कांचन कवाळे यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे, प्रकाश नाईकनवरे व त्यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे, किरण दरवान व त्यांच्या बहीण अलका जाधव यांनी एकाच सभागृहात कामकाज केले आहे.महापौर, उपमहापौर सुविधामहापौरपदासाठी प्रथम नागरिक म्हणून मानाचे स्थान, स्वतंत्र गाडी, स्वतंत्र कक्ष, सभागृहातील कामकाज चालविण्याचा अधिकार, नगरसेवकपदापेक्षा दुप्पट मानधन असते. उपमहापौरपद हे महापौरपदाच्या गैरहजेरीत सभागृह चालविण्यासाठी सोयीचे निर्माण केले आहे; पण अनेकवेळा त्यांना सभागृह चालविण्याचा मान मिळत नसल्याने त्यावर ‘शोभेचे बाहुले’ म्हणून टीका होते. या पदासाठी स्वतंत्र गाडी, स्वतंत्र कक्ष इतक्याच सुविधा मिळतात.पदाची उंची वाढविणारे पहिले महापौरबाबासाहेब जाधव (कै.) बाबासाहेब जाधव (कसबेकर) यांना पहिले महापौर होण्याचा मान १९७८ मध्ये मिळाला. एक वर्षाच्या कार्यकालमध्ये महापौरपदाची उंची ही खुर्चीमुळे नव्हे तर माणसामुळे वाढते, हे त्यांनी दाखवून दिले. शिवाजी विद्यापीठात पदवीदान समारंभावेळी त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचे मानाचे स्थान न दिल्याने त्यांनी ४१ नगरसेवकांसह समारंभावर बहिष्कार घातल्याने शहरात गदारोळ माजला. त्यावेळी तत्कालीन कुलगुरूंनी जाहीर माफी मागितल्यामुळे विषयावर पडदा पडला. गाजलेली लढतसन १९९० मध्ये शिवाजी पेठेतून भिकशेठ पाटील आणि शिवाजीराव चव्हाण यांच्यातील नगरसेवक पदाची निवडणूक आजही कोल्हापूरकरांच्या स्मरणात आहे. या चुरशीच्या लढतीत नागरिकांनी सामान्य कुटुंबातील भिकशेठ पाटील यांना ११ मतांनी विजयी केले. ही पराभवाची सल काढण्यासाठी चव्हाण यांचे चिरंजीव अजिंक्य चव्हाण यांना विजयी करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले. महापौरपदाची खांडोळीमहापौरपदासाठी नाव सुचविताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नेत्यांनी आपली राजकीय खुर्ची सांभाळण्यासाठी या महापौरपदाची खांडोळी करून अनेकांचे समाधान केले. त्यामध्ये शिरीष कणेरकर यांना सहा महिने, भीमराव पोवार आणि दीपक जाधव यांना प्रत्येकी चार महिने, तर दिलीप मगदूम आणि बाजीराव चव्हाण यांना प्रत्येकी अडीच महिने कालावधी मिळाला; पण या पदाच्या खांडोळ्यांमुळे महाराष्ट्रभर कोल्हापूर महापालिकेची बदनामी झाली. सर्वांत जास्त कालावधी खराडे यांना मिळाला. पंचवार्षिक निवडणुका झाल्यानंतर पक्षातील राजकारणाचा फायदा उठवत सई इंद्रनील खराडे यांनी नोव्हेंबर २००५ ते मे २००८ हा अडीच वर्षांचा महापौरपदाचा कालावधी पूर्ण मिळविला.