शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांच्या धामधुमीत ‘महापौर‘ प्रकरण पडले मागे

By admin | Updated: April 8, 2015 23:58 IST

नेत्यावर निष्ठेसाठी झुंबड : नगरसेवकांनी महापालिकेकडे फिरवली पाठ

कोल्हापूर : नेत्यांचे अस्तित्व अन् अस्मिता पणाला लागलेली गोकुळ, जिल्हा सहकारी बॅँक व कसबा बावड्यातील राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीची धामधूम लागून आली आहे. सहा महिन्यांत महापालिकेची निवडणूकही होत आहे. नगरसेवकांत नेत्यांवरील निष्ठा दाखविण्याची झुंबड सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी या सर्व घडामोडींत महापौरांचा राजीनामा प्रकरण मागे पडल्याचे चित्र आहे.आमदार महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, माजी आमदार पी. एन. पाटील व सतेज पाटील, विनय कोरे यांचे राजकीय हितसंबंध गोकुळ, राजाराम व केडीसीसीमध्ये गुंतले आहेत. हे सर्व नेते महापालिकेच्या राजकारणाशी निकटचा संबंध असणारे आहेत. यातच या निवडणुकीच्या माध्यमातून शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे. तिन्ही संस्थांचे कार्यक्षेत्र जिल्हा हेच असल्याने नेत्यांची मोठी दमछाक होत आहे. नेत्यांच्या मदतीला नगरसेवक धावून आले आहेत. नेते कोठे जातील तिथे काही नगरसेवक सावलीसारखे त्यांच्या पाठीशी आहेत.पडद्यामागील बैठकांचे नियोजन करणे, निरोप देणे, घडामोडींकडे लक्ष ठेवणे, संभाव्य उमेदवारांची चाचपणी करणे, आदी महत्त्वाची कामे नेत्यांनी या नगरसेवकांवर सोपविली आहेत. गेले आठ दिवस सर्व पक्षांचे नगरसेवक यामुळे व्यस्त आहेत. संध्याकाळी दररोज न चुकता येणारे वीस ते पंचवीस वजनदार नगरसेवक यामुळे महापालिकेकडे फिरकलेलेच नाहीत. आघाडीचे प्रमुख नगरसेवक व गटनेते अनुपस्थित असल्याने महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्याचे प्रकरण थंड बासनात गेले आहे. १७ एप्रिलपर्यंत त्यांच्या विरोधातील ठरावासह अर्थसंकल्पाच्या मंजुरीवर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. २० एप्रिलपर्यंत महापालिकेची महासभा होणे अपेक्षित आहे. तीन निवडणुकांमुळे महापौरांविरुद्ध विरोधाची धार कमी झाल्याचे महापालिकेतील चित्र आहे. (प्रतिनिधी)