मावळा ग्रुपचा देखावा खुला, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

By संदीप आडनाईक | Published: February 16, 2024 10:37 PM2024-02-16T22:37:10+5:302024-02-16T22:38:14+5:30

शिवजयंती निमित्त सकाळी शिवमूर्तीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी देखाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले.

Mawla Group's scenery is open, a replica of the historic Janjira Fort | मावळा ग्रुपचा देखावा खुला, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

मावळा ग्रुपचा देखावा खुला, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती


कोल्हापूर : मंगळवार पेठेतील मावळा ग्रुपच्या वतीने मिरजकर तिकटी चौकात ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती आणि छत्रपती संभाजीराजे जहाजातून त्याची पाहणी करताना मागे शिवछत्रपती उभे आहेत, असा देखावा  शुक्रवारी सर्वांसाठी खुला झाला. 

शिवजयंती निमित्त सकाळी शिवमूर्तीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी देखाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी ‘स्वराज्यनिष्ठ कोंडाजी फर्जंद' हे ऐतिहासिक नाटक सादर करण्यात आले. यानिमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी याठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. दरम्यान, या सोहळ्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांना मावळा भूषण पुरस्कार देऊन गौरविले जाणार होते, मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आज, शनिवारी पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शिवजयंती उत्सवास गुरुवारीवारपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर शिवाजी पेठेसह मंगंळवार पेठांमधील गल्ल्या भगव्या पताका, झेंडे आदींनी सजल्या आहेत. यानिमित्त वातावरण शिवमय झाले आहे.
 

Web Title: Mawla Group's scenery is open, a replica of the historic Janjira Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.