विवाहितेने पतीच्या घरासमोर तंबू ठोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:22 IST2021-04-19T04:22:00+5:302021-04-19T04:22:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराजवळ असलेल्या गावातील एक विवाहिता गेल्या सहा दिवसांपासून घरासमोरच दारात तंबू घालून ठिय्या ...

The married woman pitched a tent in front of her husband's house | विवाहितेने पतीच्या घरासमोर तंबू ठोकला

विवाहितेने पतीच्या घरासमोर तंबू ठोकला

लोकमत न्यूज नेटवर्क

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराजवळ असलेल्या गावातील एक विवाहिता गेल्या सहा दिवसांपासून घरासमोरच दारात तंबू घालून ठिय्या मारुन बसली आहे. सासरची मंडळी घरात व पोलीस तक्रार घेईनात म्हणून या विवाहितेने हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तिला न्याय मिळणार का, अशी भावना व्यक्त होत आहे.

लग्नानंतर किरकोळ कारणातून घरगुती वाद होत होते. हा वाद मिटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. दरम्यान, संबंधित विवाहिता सहा दिवसांपूर्वी सासरी आली होती. यावेळी तिला सासरच्या मंडळींनी घरात न घेता सर्वजण दरवाजाला कुलूप लावून बाहेर निघून गेले. त्यावेळेपासून तिने दारातच तंबू ठोकून ठिय्या मारला आहे. पोलीसही तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत तर न्याय मागण्यासाठी आपण पतीच्या दारात असणे हा गुन्हा आहे का, असे तिचे म्हणणे आहे.

Web Title: The married woman pitched a tent in front of her husband's house