ओकोलीत अल्पवयीन मुलीचा विवाह

By Admin | Updated: December 6, 2014 00:47 IST2014-12-06T00:36:35+5:302014-12-06T00:47:13+5:30

आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Marriage of a minor girl in Okoli | ओकोलीत अल्पवयीन मुलीचा विवाह

ओकोलीत अल्पवयीन मुलीचा विवाह

मलकापूर : ओकोली (ता. शाहूवाडी) येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर संगनमताने विवाह लावल्याप्रकरणी दोन्हीकडील आठजणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलीस पाटील राजेश पाटील (रा. आरूळ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ओकोली येथील पंकज बंडू पाटील यांचा विवाह लाळेवाडी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गावापासून सुमारे सहा किलोमीटर लांब असणाऱ्या पावडाई देवीच्या मंदिरात झाला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे मुलगा व मुलगीच्या घरी माहिती असतानादेखील कायद्याला बगल देऊन मुलगा पंकज, वडील पांडुरंग पाटील, आई इंदुबाई पाटील, भाऊ रंगराव पाटील (सर्व जण रा. ओकोली), तर मुलगीची आई रंजना सुरेश लाळे, चुलता शंकर लाळे, चुलती इंदुबाई शंकर लाळे व अज्ञात भटजी (सर्व रा. ओकोली पैकी लाळेवाडी) या आठजणांनी संगनमताने अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार बाबा कुंभार करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Marriage of a minor girl in Okoli