राधानगरीत मराठी भाषा कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:50+5:302021-02-06T04:42:50+5:30

राधानगरी : सर्व शासकीय कामकाज मराठी भाषेतूनच झाले तरच मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धी होईल, असे प्रतिपादन ...

Marathi language workshop in Radhanagar | राधानगरीत मराठी भाषा कार्यशाळा

राधानगरीत मराठी भाषा कार्यशाळा

राधानगरी : सर्व शासकीय कामकाज मराठी भाषेतूनच झाले तरच मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धी होईल, असे प्रतिपादन राधानगरी वकील संघटनेचे माजी अध्यक्ष डी. एम. पोतदार यांनी केले. येथील दिवाणी न्यायालयात भाषा संवर्धन व कायदेविषयक साक्षरता शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष जी. के. वागरे होते. दिवाणी न्यायाधीश एस. के. शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

पोतदार म्हणाले, महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. प्रमुख भाषा मराठी आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील व्यवहार मराठी भाषेत करण्याचे शासनाचे निर्देश असताना मराठी भाषेचा वापर केला जात नाही, ही खरी खंत आहे. यावेळी यू. एम. मानकर, एस. के. मानकर, आर. डी. खाडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन ए. ए. खोत, आर. ए. पाटील, जी. सी. जाधव यांनी केले. यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी, सर्व सदस्य, कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते. आभार व्ही. व्ही. पाटील यांनी मानले.

Web Title: Marathi language workshop in Radhanagar