मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:15+5:302021-02-05T06:54:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : प्राकृत भाषेची हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याबाबतचा ...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा :
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : प्राकृत भाषेची हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याबाबतचा विस्तृत अहवाल सर्व पुराव्याशिवाय????? सात वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे समितीने सादरही केला आहे. तरी राजकीय इच्छाशक्ती सकारात्मकतेने वापरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे मत प्रा. सौरभ पाटणकर यांनी व्यक्त केले.
येथील समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा आणि साहित्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक तात्यासाहेब कुडचे व इचलकरंजीच्या पहिल्या लोकनियुक्त नगरसेविका कलावती मुठाणे यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रा. पाटणकर यांनी भाषेची उत्पत्ती, मानवी उत्क्रांतीतील भाषेचे महत्त्व, समाज आणि भाषा, मराठी भाषेचा उद्गम व विकास, मराठीतील शिलालेख व प्राचीन-अर्वाचीन ग्रंथ, भाषाव्यवहार, भाषा आणि संस्कृती, संतपरंपरा, महानगरीय साहित्य, समकालीन भाषा व साहित्य, भाषेच्या अस्तित्वाचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे सविस्तर मांडणी केली.
शशांक बावचकर यांनी स्वागत व अन्वर पटेल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे, अशोक केसरकर, पांडुरंग पिसे, तुकाराम अपराध, आदी उपस्थित होते. सचिन पाटोळे यांनी आभार मानले.
(फोटो ओळी) २४०१२०२१-आयसीएच-०१ इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीत 'मराठी भाषा आणि साहित्य' या विषयावर प्रा. सौरभ पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्वर पटेल उपस्थित होते.