शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतीत विरोधकांची विधाने प्रक्षोभक व बेजबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:51 IST

Maratha Reservation : मराठा समाजाच्या भावना लवकरात लवकर शासनापर्यंत पोहचाव्यात म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी रास्ता रोकोचे आंदोलन केले, पण मोर्चात सहभागी झालेल्या ठरावीक संघटना व विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक व बेजबाबदार विधाने केली.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाबाबतीत विरोधकांची विधाने प्रक्षोभक व बेजबाबदारसुजित चव्हाण यांचे स्पष्टीकरण : समितीतील काहींना दिला घरचा आहेर

कोल्हापूर : मराठा समाजाच्या भावना लवकरात लवकर शासनापर्यंत पोहचाव्यात म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी रास्ता रोकोचे आंदोलन केले, पण मोर्चात सहभागी झालेल्या ठरावीक संघटना व विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक व बेजबाबदार विधाने केली.

वास्तविक महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या बाबतीत आश्वासक पाऊले उचलत असताना आंदोलनादरम्यान ते कसे उदासीन आहे, हे दाखवण्याची ठरावीक पक्ष व संघटनांनी केलेली कृती चुकीची आहे, याचा आम्ही निषेध करतो, राज्य सरकारबरोबर समन्वय ठेवूनच हा प्रश्न सुटेल यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे स्पष्टीकरण सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.मराठा आरक्षण लढाई लढण्यासाठी स्थापन झालेल्या या समितीत भाजपला पूरक भूमिका घेणारे कार्यकर्तेही आहेत. त्यांनी मोर्चावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याने चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण करून खासदार संभाजीराजे व राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

पत्रकात ते म्हणतात, खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची घोषणा करुन सरकारशी समन्वयाची भूमिका राखण्याचा प्रयत्न केला. उपद्रवी लोकांच्या चिथावणीखोर वक्तव्याने आंदोलनाला गालबोट लागू नये हाच त्या मागचा उद्देश होता. राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत, तेवढ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पाऊले उचलली आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात लक्ष घालत आहेत. तरीदेखील या प्रक्रियांना अधिक गती यावी म्हणून रास्ता रोकोचे आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले.

तथापि तेथे सरकार विरोधी केलेली वक्तव्ये आम्हाला पटलेली नाहीत, ती सरकारवर अविश्वास दाखवणारी व लढ्याचे बळ कमी करणारी असल्याचे लक्षात आल्यानंतरच आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत. त्यानुसार येथून पुढे देखील सरकारच्या भूमिकेशी सहमत राहून समन्वयाने आणि योग्य संपर्क ठेवूनच हा प्रश्न सुटेल. हे सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देईल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर