Maratha Reservation : संभाजीराजेंना भेटून चंद्रकांत पाटील यांनी दिले पाठिंब्याचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:41 IST2021-06-16T17:39:19+5:302021-06-16T17:41:10+5:30
Maratha Reservation : गेले पाच दिवस एकमेकांवर टोलेबाजी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुक आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी समोरासमोर आले.

Maratha Reservation : संभाजीराजेंना भेटून चंद्रकांत पाटील यांनी दिले पाठिंब्याचे पत्र
कोल्हापूर : गेले पाच दिवस एकमेकांवर टोलेबाजी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुक आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी समोरासमोर आले.
शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आल्याआल्या पाटील यांनी संभाजीराजे यांना आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. यावेळी पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडायची आहे ती मी पुण्याचा लोकप्रतिनिधी असल्याने पुण्यात मांडणार आहे.
या ठिकाणी मी मराठा समाजातील एक नागरिक म्हणून आलो आहे. यानंतर संभाजीराजे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे पुण्याचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना तेथील आंदोलनावेळी निमंत्रित केले जाईल. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. या दोघांच्या भेटीकडे उपस्थित सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.