शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"शिवभक्त प्रविण गायकवाड, महाराष्ट्र तुमच्यासोबत", हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात एकवटला मराठा समाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:01 IST

शिवाजी महाराजांची बदनामी यापूर्वी ज्यांनी ज्यांनी केली, त्यावेळी हे बेगडी शिवप्रेमी बिळात लपून बसले

कोल्हापूर : ''शिवभक्त प्रविण गायकवाड, महाराष्ट्र तुमच्यासोबत'' असे फलक हाती घेत हल्लेखोरांच्या विरोधात सोमवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत निदर्शने केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या कोल्हापुरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते एकवटले. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी चौक दणाणून गेला. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वसंत मुळीक, संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, शिवशाहीर दिलिप सावंत, राजमाता जिजाउ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, राजू सावंत, हिंदूराव हुजरे-पाटील, शशिकांत पाटील यांची भाषणे झाली. वसंत मुळीक म्हणाले, शिवाजी महाराजांची  बदनामी यापूर्वी ज्यांनी ज्यांनी केली, त्यावेळी हे बेगडी शिवप्रेमी बिळात लपून बसले. हल्ला करणाऱ्या गुंडांवर तत्काळ कारवाई केली नाही तर मराठा समाजाच्या  रोषाला सामोरे जावे लागेल. रुपेश पाटील म्हणाले, गायकवाड यांची बदनामी करण्यासाठीच हा हल्ला केला आहे.  त्यांची तत्काळ चौकशी करावी,  शिवशाहीर दिलिप सावंत म्हणाले, बहुजन जेव्हा जेव्हा उभे राहतो, तेव्हा तेव्हा ते न बघवणारे सनातनी पुढे येतात आणि अशाप्रकारे हल्ला करतात. त्यांच्यावर कारवाई करावी.

सुनीता पाटील म्हणाल्या, गायकवाड यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा  खरा इतिहास पुढे आणला. त्यांचा  विचार संपवण्यासाठी असे भ्याड हल्ले केले जातात, पण त्यांनी संभाजी ब्रिगेडला डिवचले आहे. त्यांच्या शेवटाची ही सुरुवात  आहे.निदर्शनात इंद्रजीत सावंत उमेश पोवार, बाळासाहेब पाटील, विकास जाधव, भगवान कोईगडे, अभिजीत कांजर, सुधा सरनाईक, शैलजा भोसले, जीवन बोडके, उमेश सूर्यवंशी, हिदायत मणेर, राजू मालेकर सहभागी झाले होते.