शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: आधे इधर, आधे उधर... उमेदवारीसाठी दिवसभर पक्षांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:59 IST

राहुल आवाडे यांच्या पत्नी, कन्या निवडणूक रिंगणात

कोल्हापूर : सकाळी एका पक्षात प्रवेश केलेला नेता, कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात गेल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी पाहावयास मिळाले. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात घाऊक पद्धतीने पक्षांतर झाल्याचे पाहावयास मिळाले. ‘उमेदवारी मिळत नाही तर कर पक्षांतर’ या सूत्रानुसार पक्षांतरांचा हा कार्यक्रम दिवसभर वेगवेगळ्या तालुक्यात आणि कोल्हापुरातही सुरू राहिला.गेले काही महिने प्रलंबित असलेला जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांचा भाजप प्रवेश बुधवारी झाला असून, गडहिंग्लजमध्ये आता भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार)विरोधात शड्डू ठोकला आहे. नेसरी गटातून उमेदवारी मिळणार नसल्याने भाजपचे संग्रामसिंह कुपेकर यांनी सकाळी राष्ट्रवादी (शरद पवार)त, तर दुपारनंतर राष्ट्रवादी (अजित पवार)त प्रवेश केला.राजकुमार हत्तरकी यांचे चिरंजीव शिवशंकर यांनीही हलकर्णीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी (अ. प.)त प्रवेश केला. त्यांच्या मातोश्री दिवंगत रेखाताई या गेल्या सभागृहात ताराराणी आघाडीतून विजयी झाल्या होत्या. काँग्रेस नेत्या अंजना रेडेकर यांचे चिरंजीव नूलच्या उमेदवारीसाठी जनसुराज्यमध्ये गेले आहेत. आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहायक सुहास राजमाने यांच्यासाठी रुई मतदारसंघ न सुटल्याने त्यांना भाजपच्या चिन्हावर उभे करण्यात येणार आहे.

माघारीदिवशी दुसरा अंकआता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षप्रवेशाची बुधवारी माळ लागली. याच पद्धतीने आता माघारीदिवशी म्हणजे २७ जानेवारीला या घडामोडींचा दुसरा अंक पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना आणखी ऊत येणार आहे.

आवाडे कुटुंबीय चर्चेतआमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून बुधवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, आवाडे यांच्या पत्नी मौश्मी यांनीही रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज भरल्याने दिवसभर याची चर्चा सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election Sees Mass Party Switching for Candidacy

Web Summary : Kolhapur witnessed widespread party switching on the last day for nominations. Leaders and workers changed affiliations seeking candidacy for Zilla Parishad and Panchayat Samiti elections. The आवाडे family is also in the spotlight due to multiple filings.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी