शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदार तयार, तोडणी खर्चावर मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:22 IST

FRP : यंदा ऊस जास्त आहे, पावसाने हंगाम लांबणीवर पडला आहे. वादळी वाऱ्याने पिक आडवे झाले आहे. त्यामुळे हंगाम कधी एकदा सुरु होतो अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे.

कोल्हापूर : साखरेच्या कोंडीमुळे एफआरपीचे तुकडे अटळ असल्याचे करारपत्र लिहून घेणाऱ्या कारखानदारांनी शनिवारी तोडग्यासाठी बोलावलेल्या पहिल्याच बैठकीत अवघ्या दहा मिनिटात एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले, पण मजुरीवाढीमुळे घटलेली १४ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना द्या व हा खर्च कारखान्यांनी करावा अशी मागणी लावून धरली, कारखानदारांनी प्रतिसाद न दिल्याने बैठकीतून बाहेर येऊन संघटनेने हा निर्णय होईपर्यंत धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा दिला. संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असला तरी एकरकमी एफआरपीवर तोडगा निघाल्याचे मानले जात आहे. यंदा ऊस जास्त आहे, पावसाने हंगाम लांबणीवर पडला आहे. वादळी वाऱ्याने पिक आडवे झाले आहे. त्यामुळे हंगाम कधी एकदा सुरु होतो अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. शिवाय शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीमधूनही किमान २८०० ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळणार असल्याने हाच तोडगा होण्याची शक्यता आहे. दराचा निर्णय झाला तरी हंगाम दिवाळी झाल्यावरच गती घेणार आहे.जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे, पण ऊस परिषद झाल्याशिवाय हंगाम घेतल्यास आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या २० व्या उस परिषदेच्या दोन दिवस आधीच शनिवारी शासकीय विश्रामगृहावर कारखानदारांची बैठक झाली.

भाजप कारखानदारांची पाठबैठकीत भाजपशी संबंधित शाहू, राजाराम, वारणा कारखान्यांच्या प्रतिनिधीनी पाठ फिरवली. समरजित घाटगे, आमदार विनय काेरे, महादेवराव महाडीक बैठकीला अनुपस्थित होते. शिवाय या बैठकीला स्वाभिमानी वगळता अन्य शेतकरी संघटनांना आमंत्रणही नव्हते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर