मनोज जरांगे १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात, भव्य स्वागताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 12:01 IST2023-11-10T11:37:52+5:302023-11-10T12:01:18+5:30

कोल्हापूर : मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील हे १७ नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी २ वाजता ते ...

Manoj Jarange on November 17 in Kolhapur | मनोज जरांगे १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात, भव्य स्वागताची तयारी

मनोज जरांगे १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात, भव्य स्वागताची तयारी

कोल्हापूर : मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील हे १७ नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी २ वाजता ते येतील. त्यांची येथे भव्य अशी सभा होणार आहे. सभेसाठी जागा निश्चित करण्याचे काम येथील सकल मराठा समाजातर्फे केले जात आहे. दोन दिवसात ठिकाण निश्चित होणार आहे.

दौऱ्यात ते विविध मान्यवरांची भेट घेणार आहेत. जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रान पेटवले आहे. ते पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहेत. त्याचे भव्य असे स्वागत करण्यात येणार आहे. त्याची तयारी केली जात आहे.

मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे. दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. राज्यभरातून त्यांना सभा घेण्यासाठी आमंत्रित केले जात असल्याने जरांगे-पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून  राज्यात संपर्क दौरा करण्याची घोषणा केली. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत

Web Title: Manoj Jarange on November 17 in Kolhapur