Kolhapur: 'बिहारी'च्या मुलीचा आदर्श, दहावी परीक्षेत मिळवले ९७.२० टक्के; भाषेचा अडथळा दूर करत सिद्ध केली गुणवत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:05 IST2024-05-28T13:04:37+5:302024-05-28T13:05:00+5:30
इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने बिहार राज्यातून कामासाठी येऊन राहिलेल्या ब्रिजेश प्रसाद या यंत्रमाग कामगाराची मुलगी मंजूकुमारी हिने ९७.२० ...

Kolhapur: 'बिहारी'च्या मुलीचा आदर्श, दहावी परीक्षेत मिळवले ९७.२० टक्के; भाषेचा अडथळा दूर करत सिद्ध केली गुणवत्ता
इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने बिहार राज्यातून कामासाठी येऊन राहिलेल्या ब्रिजेश प्रसाद या यंत्रमाग कामगाराची मुलगी मंजूकुमारी हिने ९७.२० टक्के गुण मिळवत सरस्वती हायस्कूलमध्ये प्रथम आली.
बिहार राज्य सोडून कामासाठी इचलकरंजीत येऊन राहिलेल्या ब्रिजेश प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी यंत्रमागावर काम करत मुलगी मंजूकुमारीला महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी घातले. परप्रांतीय असूनही भाषेचा अडथळा दूर करत मंजूकुमारीने पाचवी शिष्यवृत्तीत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
त्यानंतर आठवीमध्ये ती सरस्वती हायस्कूलमध्ये दाखल झाली. तेथे राज्य गुणवत्ता यादीमध्ये आणि एनएमएमएस या केंद्र सरकारच्या परीक्षेतही तिने शहरात प्रथम येऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. कठीण परिश्रम, स्वत:वर विश्वास यातून जिद्दीने शिक्षण घेत मंजूकुमारीने दहावीमध्ये घवघवीत यश संपादन केले. या यशामध्ये तिला पालक, मुख्याध्यापक पी.डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.