शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मनीषा मसुरकर, अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:49 IST

वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा दीपा गजोबार यांनी दीड वर्षाने नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर व मनीषा मसुरकर यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे ११ महिन्यांच्या शेवटच्या टर्मची नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमनीषा मसुरकर, अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतदीपा गजोबार यांचा राजीनामा : शेवटच्या टर्मची लॉटरी कोणाला?

वैभववाडी : वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा दीपा गजोबार यांनी दीड वर्षाने नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर व मनीषा मसुरकर यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे ११ महिन्यांच्या शेवटच्या टर्मची नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वाभिमानचे वर्चस्व असलेली नगरपंचायत आता १०० टक्के भाजपच्या अधिपत्याखाली आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी वर्षभरापूर्वी स्वाभिमानमध्ये प्रवेश केल्याने स्वाभिमानच्या नगरसेवकांची संख्या १३ वर पोहोचली होती. तर विरोधी भाजपाच्या नगरसेवकांची संख्या ४ वर आली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात स्वाभिमान भाजपात विलीन झाल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या १७ झाली आहे.वाभवे-वैभववाडीचे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून निवडून आलेल्या परंतु इतर मागास प्रवर्गातील असलेल्या दीपा गजोबार यांच्या गळ्यात २४ मे २०१८ रोजी नगराध्यक्षपदाची माळ पडली होती. अनेक दावेदार असतानाही त्यांनी दीड वर्ष नगराध्यक्षपदाची खुर्ची सांभाळली. त्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार सोमवारी गजोबार यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्याकडे दिला.

नगराध्यक्षपदासाठी आरोग्य, शिक्षण समिती सभापती समिता कुडाळकर, अक्षता जैतापकर व मनीषा मसुरकर या तीन नगरसेविका दावेदार आहेत. यापैकी मनीषा मसुरकर या मूळ भाजपच्या नगरसेविका आहेत. तर कुडाळकर आणि जैतापकर स्वाभिमान पक्षाच्या विलिनी-करणामुळे भाजपवासी झाल्या आहेत.

गेल्यावेळी जैतापकर व कुडाळकर प्रबळ दावेदार असताना गजोबार यांना संधी दिली. त्यामुळे शर्यतीत असलेल्या जैतापकर, मसुरकर व कुडाळकर यांच्यापैकी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.अधिक काळाच्या संधीने मी समाधानी!नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याबाबत दीपा गजोबार यांच्याकडे विचारणा केली असता, सव्वा वर्षाकरिता पक्षाने आपल्याला संधी दिली होती. त्यापेक्षा अधिक काळ पदावर राहिले. त्यामुळे मी समाधानी आहे. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे, असे गजोबार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Mayorमहापौरsindhudurgसिंधुदुर्ग