मानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:16 IST2020-12-05T17:14:16+5:302020-12-05T17:16:04+5:30

Crimenews, Police, Kolhapurnews कोते पैकी मानेवाडी (ता. राधानगरी) येथील युवकाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. पिडीत मुलगी बेशुद्ध होऊन दुकानातच कोसळली. या वेळी तेथे असलेल्या या मुलीच्या लहान भावाने घराकडे पळत जाऊन घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला

At Manewadi, a minor girl was molested and a stone was thrown at her house | मानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरावर दगडफेक

मानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरावर दगडफेक

ठळक मुद्देमानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंगमुलीच्या घरावर व दुकानावर दगडफेक, दहशत माजवण्याचा प्रयत्न

धामोड : कोते पैकी मानेवाडी (ता. राधानगरी) येथील युवकाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. पिडीत मुलगी बेशुद्ध होऊन दुकानातच कोसळली. या वेळी तेथे असलेल्या या मुलीच्या लहान भावाने घराकडे पळत जाऊन घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलगीच्या वडिलांनी घटनास्थळावर धाव घेत या युवकांना जाब विचारला असता मुलीच्या घरावर व दुकानावर दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रकार केला.

या प्रकाराबाबत राधानगरी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. मानेवाडी येथे पिडीत मुलीच्या वडीलांचे किराणा मालाचे दुकान आहे. मुलीचे आई, वडील शेतात गेल्याची माहीती घेऊन पप्पु विठ्ठल माने याने दुकानात गोळ्या व चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने मुलीचा हात धरून लगट करून विनयभंग केला.

यावेळी तिच्यासोबत तिचा लहान भाऊ होता. पीडित मुलगी बेशुद्ध होऊन खाली कोसळली. त्या लहान मुलांने आरडा ओरड करताच युवकाने पलायन केले. ही घटना त्या लहान मुलाने आपल्या आई, वडीलांना सांगीतली तेंव्हा वडिलांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेत या तरुणांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा संबंधित युवकाने पुन्हा परत येवुन मुलीच्या घरावर व दुकानावर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे .

या घटनेचा राधानगरी पोलीसात गुन्हा नोंद झाला असून पप्पु विठ्ठल माने याला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय डुबल व पोलीस उपनिरीक्षक एम एच शेख करत आहेत .

Web Title: At Manewadi, a minor girl was molested and a stone was thrown at her house