शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा ‘एक विद्यार्थी, एक रोप’ उपक्रम

By admin | Updated: July 27, 2015 00:01 IST

प्राथमिक शिक्षण मंडळ : शाळेचा परिसर होणार हिरवागार

प्रदीप शिंदे - कोल्हापूर --राज्यातील शाळांमध्ये दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपण मोहिमांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या व्हावी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, जैवविविधता, तसेच दुर्मीळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्यांच्या संवर्धनाबाबत संस्कारक्षम वयातच जाणीव व आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने यंदापासून ‘एक विद्यार्थी, एक रोप’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘एक विद्यार्थी, एक रोप’ या उपक्रमात फक्त विद्यार्थ्यांना सहभागी करून न घेता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच काढले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण मंडळाचे उपसभापती भरत रसाळे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे आता महानगरपालिकेच्या शाळांसह परिसर हिरवागार तर होणारच; पण त्याचसोबत विद्यार्थ्यांत पर्यावरणाची जनजागृती नक्कीच होणार आहे. कऱ्हाड येथील नगरपालिकेच्या शाळेत जाऊन या उपक्रमांची माहितीही मंडळाच्यावतीने नुकतीच घेतली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला एक कुंडी रोपटे दिले जाणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असणार आहे. त्यामुळे माझे झाड ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रूजविण्यास मदत होईल. ही योजना शाळेपुरतीच मर्यादित न ठेवता शहर, गावपातळीवरही याचा प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. या उपक्रमासाठी आम्ही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींचीही मदत घेणार असल्याचे रसाळे यांनी सांगितले.प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत एका कुंडीसह रोप दत्तक म्हणून देण्यात येणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर असेल. झाडे लावण्यासाठी दिल्यानंतर विद्यार्थी झाडांचे संगोपन चांगल्याप्रकारे करतात की नाही, यांची पाहणी शिक्षकांमार्फत केली जाणार आहे. त्याची पाहणी व नोंद प्राथमिक शिक्षण मंडळाच्या निरीक्षकांमार्फत दर महिन्याला घेतली जाणार आहे.- महेश जाधव, सभापती, प्राथमिक शिक्षण मंडळ, मनपा