मद्यपानासाठी केबल चोरणाऱ्या एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:13+5:302021-01-20T04:25:13+5:30
इचलकरंजी : इंटरनेट केबल जोडणाऱ्या कामगारानेच मद्यपानासाठी केबल चोरल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रेकॉर्डवरील एकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ...

मद्यपानासाठी केबल चोरणाऱ्या एकास अटक
इचलकरंजी : इंटरनेट केबल जोडणाऱ्या कामगारानेच मद्यपानासाठी केबल चोरल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रेकॉर्डवरील एकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. स्वप्निल चौधरी (रा. पंचशीलनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे.
इंटरनेट केबल जोडणीचे काम करणाऱ्या ठेकेदाराची सात किलोमीटर लांबीची केबल चोरीस गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याबाबत ठेकेदाराने शिवाजीनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्यावेळचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये केबल जोडण्याचे काम करणारा स्वप्निल आढळला. त्यामुळे पोलिसांनी स्वप्निल याला केबल जोडणीचे काम असल्याचे सांगून सांगलीतून बोलवून घेण्यास ठेकेदाराला सांगितले. तो आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मद्यपानासाठी पैसे कमी पडल्याने केबल चोरी करून जयसिंगपूरमधील एकास विक्री केल्याचे कबूल केले.