माकोडे ,दीक्षित विजेते

By Admin | Updated: August 26, 2015 23:25 IST2015-08-26T23:25:40+5:302015-08-26T23:25:40+5:30

एलआयसी पश्चिम क्षेत्रीय बॅडमिंटन : पन्नास खेळाडूंचा सहभाग

Makode, Dikshit winners | माकोडे ,दीक्षित विजेते

माकोडे ,दीक्षित विजेते

कोल्हापूर : सासने मैदान येथील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या ‘एलआयसी’च्या ४९ व्या पश्चिम क्षेत्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांत किरण माकोडे यांनी, तर महिलांत वरदा दीक्षित यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या खेळाडूंना वरिष्ठ मंडल प्रबंधक राजकिशोर नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांतून व २३ विभागीय कार्यालयांतील ५० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील अनुक्रमे विजयी खेळाडू असे : पुरुष : किरण माकोडे, अरविंद गंगाणी, प्रदोश सिलीमखान. महिला : वरदा दीक्षित, लीना ढापरे, एस. एस. सोवनी.
बक्षीस वितरणप्रसंगी ‘एलआयसी’चे विपणन प्रबंधक एम. जी. पाटखेडकर, प्रबंधक राघवेंद्र इनामदार, नरेंद्र अधिकारी, स्पोर्टस प्रमोशन बोर्डचे सदस्य पूर्णानंद जमदाडे, ममता सावणे, पश्चिम क्षेत्र प्रतिनिधी बळिराम के. यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे नियोजन एलआयसी कोल्हापूरच्या प्रशांत घाटगे, उदय राऊत, शशिकांत देशपांडे, सर्जेराव निगडे, प्रवीण वरुटे, जयसिंग मिसाळ, दीपक कोरे, पी. एम. बगाटे, राजू कणेगावकर, सतीश मोरे, निखिल कुलकर्णी, सुहास चौगले, उमेश सरनोबत, संतोष सरीकर, शहाजी कांबळे, संजय वडगांवकर यांनी केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Makode, Dikshit winners