पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणी अनिवार्य करा

By Admin | Updated: January 23, 2015 23:34 IST2015-01-23T22:53:10+5:302015-01-23T23:34:59+5:30

‘अभाविप’ : प्र-कुलगुरूंना दिले विविध मागण्यांचे निवेदन

Make sure the postal ballot is compulsory for eligible professors | पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणी अनिवार्य करा

पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणी अनिवार्य करा

कोल्हापूर : विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक ६० दिवस आधी प्रसिद्ध करावे. सर्व निकाल ४५ दिवसांत लावण्यात यावेत. सर्व पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अनिवार्य करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आज, शुक्रवारी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांना दिले.
सत्र परीक्षांचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी करावे. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न, प्रवेशपत्र, गुणपत्रिका, आदींमधील गोंधळ त्वरित नियंत्रणात आणावा. विद्यापीठ व महाविद्यालयांतील शुल्क जमा करण्यासाठी ‘ई-पेमेंट’ सुरू करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे ‘अभाविप’च्या शिष्टमंडळाने केल्या. अभ्याससंच उपलब्ध झाले नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत देण्यात येईल. अन्य मागण्यांबाबत प्रशासनाकडून विचार करून कार्यवाही केली जाईल, असे प्र-कुलगुरू डॉ. भोईटे यांनी सांगितले.
शिष्टमंडळात अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री देवदत्त जोशी, कोल्हापूर जिल्हा संयोजक स्वागत परुळेकर, इचलकरंजी महामंत्री पंकज गडकरी, सांगलीच्या सुप्रिया पाडळकर, आदींचा समावेश होता. . (प्रतिनिधी)

Web Title: Make sure the postal ballot is compulsory for eligible professors