शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्त करा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST

शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी. शिवाय, प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात ...

शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी. शिवाय, प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात यावा. येत्या सात दिवसांत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाची पाहणी करण्यास महसूल विभागाला भाग पाडून निवेदन देण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाला कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी वस्त्रोद्योग कारखाने, औद्योगिक वसाहती, थेट सांडपाणी सोडणारी गावे जबाबदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नदीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे विविध बंधाऱ्यांवर लाखो मृत माशांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक लोकांना प्रदूषित पाण्यामुळे जीव गमवावा लागला आहे. इचलकरंजी शहरातील उद्योग व्यवसायातील प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळते, हे गंभीर कारण असून प्रक्रिया न करता थेट नदीत पाणी सोडणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्यात आले.

यावेळी सागर शंभूशेटे, पं. स. उपसभापती सचिन शिंदे, नगरसेवक प्रकाश गावडे, युनूस पटेल, तानाजी वठारे, बाळासाहेब कांबळे, दिलीप परीट, बंडू पाटील, अनिल चव्हाण, रामगोंडा खंजिरे, महावीर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - ०९०२२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - शिरोळ येथे पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीच्या वतीने नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सागर शंभूशेटे, प्रकाश गावडे, युनूस पटेल, सचिन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.